Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

SBI Q2 Results : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:35 PM2024-11-08T15:35:57+5:302024-11-08T15:35:57+5:30

SBI Q2 Results : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

SBI Q2 Results SBI s profit up 28 percent in second quarter beats expectations What is the status of the share | SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

SBI Q2 Results : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा स्टँडअलोन निव्वळ नफा २८ टक्क्यांनी वाढून १८,३३१.४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १४,३३० कोटी रुपये होता.

एसबीआयचा नफा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा अधिक वाढला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं व्याजावरील उत्पन्न १२.३ टक्क्यांनी वाढून १.१४ लाख कोटी रुपये झालंय. एसबीआयमध्ये कर्जाची मागणीही उत्तम आहे.

शेअरमध्ये घसरण

शुक्रवारी एसबीआयचा शेअर घसरणीसह व्यवहार करताना दिसला. शुक्रवारी दुपारी मुंबई शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर १.४१ टक्क्यांनी घसरून ८४७.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ९१२.१० रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५५५.२५ रुपये आहे. बीएसईवर बँकेचे मार्केट कॅप ७,५३,९०७.२८ कोटी रुपये होते.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: SBI Q2 Results SBI s profit up 28 percent in second quarter beats expectations What is the status of the share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.