मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक आणि ब्रूकफिल्ड ही कंपनी यांनी संयुक्तरित्या गुंतवणूक करत एक अब्ज डॉलरचा निधी उभारुन एक कंपनी स्थापन केली आहे. या निधीचा उपयोग अनुत्पादित कर्जाच्या संपत्तीत गुंतवणूक करण्यासाठी केला जाणार आहे. एसबीआयने याबाबत म्हटले आहे की, या संयुक्त उपक्रमात ब्रूकफिल्ड सात हजार कोटी रुपये गुंतविणार आहे. तर एसबीआय अनुत्पादित कर्जांच्या संपत्तीत एकूण पाच टक्के गुंतवणूक करणार आहे. बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, अनुत्पादित कर्जातून मार्ग काढण्यासाठी हा एक पर्याय आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय कंपन्यांशीही चर्चा केली जात आहे. अनुत्पादित कर्जाच्या संपत्तीची माहिती ब्रूकफिल्डकडून घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
एसबीआय उभारणार एक अब्ज डॉलर निधी
By admin | Published: July 21, 2016 12:02 AM