Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI Recruitment 2023 : SBI'मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ९०० पदांसाठी निघाली भरती; असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023 : SBI'मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ९०० पदांसाठी निघाली भरती; असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023 : SBI मध्ये नोकरी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:16 PM2023-03-27T13:16:03+5:302023-03-27T13:16:21+5:30

SBI Recruitment 2023 : SBI मध्ये नोकरी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

sbi recruitment 2023 for support officer at sbi co in check details here | SBI Recruitment 2023 : SBI'मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ९०० पदांसाठी निघाली भरती; असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023 : SBI'मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ९०० पदांसाठी निघाली भरती; असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023 : SBI मध्ये नोकरी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ८७७ पदांसाठी अर्ज मागण्यात आले आहेत.  या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळेल. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया (SBI SO Recruitment 2023) सुरू झाली असून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२३ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण माहिती पाहा.

एसबीआयमध्ये एकूण ८७७ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२३ पर्यंत मुदत आहे. 

महागाई, मंदी, नोकर कपात! यंदा किती पगारवाढ होणार? कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार...

जे उमेदवार यासाठी अर्ज करु इच्छित आहेत ते एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी असणे बंधनकारक आहे.  पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी एसबीआयचे अधिकृत वेबसाईटवर माहिती मिळेल. 

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

वेतन

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते ४५,००० रुपये वेतन दिले जाईल.

असा भरा अर्ज

अर्ज करण्यासाठी, अगोदर अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in ला भेट द्या. यात वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज दिसेल, तुमचा अर्ज भरा. फॉर्म भरल्यानंतर, कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज फी भरा, पुढं या फॉर्मची प्रिंट घ्या.

Web Title: sbi recruitment 2023 for support officer at sbi co in check details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.