नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा SBI ग्राहकांना मिळवून देणार आहे. SBIने मार्च 2019मध्ये स्वतःची सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना RBIच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे. RBIनं व्याजदरां (रेपो रेट)मध्ये केलेल्या पाव टक्क्याच्या कपाताचा SBIच्या ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून SBI बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.
तत्पूर्वी गेल्या महिन्यात एसबीआयनं व्याजदरात मोठे बदल केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम झाला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू झाला आहे.
रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदरांमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एसबीआयसह अन्य बँकांनी गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजामध्ये कपात केली होती. एसबीआयने कर्जावरील व्याजदरामध्ये 0.05 टक्क्यांनी किरकोळ कपात केली होती.
स्टेट बँक ऑफ इंडियानं MCLRमध्ये बदल केला. बँकांसाठी कर्ज व्याजदर निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पद्धतीला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लँडिंग रेट (एमसीएलआर) म्हणतात. यामुळे ग्राहकांना कमी व्याजदराचा लाभ होतो. याचा बँकांच्या व्याजदर प्रक्रियेत पारदर्शकता आणि कर्ज घेणार्यांना फायदा होत असतो. आरबीआय व्याजदरात कपात करेल त्याचप्रमाणे बँकांना आपले व्याजदर कमी करावे लागतील. पण यापूर्वी बेस रेटमुळे बँकांवर असे बंधन नव्हते.
खूशखबर! RBIच्या निर्णयानंतर SBIचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, 1 जुलैपासून स्वस्त होणार कर्ज
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा SBI ग्राहकांना मिळवून देणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 10:51 AM2019-06-08T10:51:35+5:302019-06-08T10:52:59+5:30