गेल्या काही वर्षांत बँकिंग सेक्टरमध्ये बरेच बदल बघायला मिळाले आहेत. मात्र असे असतानाही, ग्राहकांना खाते उघडण्यापासून ते इतरही काही कामांपर्यंत अजूनही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता आपण घरबसल्याच एका मिनिटाच्या आत आपली तक्रार नोंदवू शकता. तर जाणून घेऊयात यासंदर्भातील संपूर्ण प्रोसेस..
यासंदर्भात, राज सिंह नावाच्या एका व्यक्तीने ट्विट केले आहे, की 'ब्रांचमध्ये आतापर्यंतचा सर्वात खराब अनुभव आला. अकाउंट ओपन करण्यासाठी अथवा इतरही काही कामांसाठी, एकतर अधिकारी दुसऱ्याकडे ढकलायचे अथवा लक्षच देत नव्हते.' यावर स्टेट बैंक ऑफ इंडियाकडून, 'असुविधा झाल्याबद्दल खेत आहे,' असे उत्तर आले. याच बरोबर, बँकेने राज यांना तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला आहे.
team will look into the matter. Alternatively, you can also register your complaint by calling our contact centre at Toll Free Numbers- 1800 1234, 1800 2100, 1800 11 2211, 1800 425 3800 or at Toll Free Number: 080-26599990. (2/2)
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 26, 2022
अशी नोंदवा तक्रार?
ग्राहक https://crcf.sbi.co.in/ccf/ वर आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्रहाक पर्सनल सेगमेंट अथवा इंडिव्हिजुअल कस्टमर सेक्शनच्या माध्यमाने आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय ग्राहक टोल फ्री नंबर 1800 1234, 18000 2100, 1800 112211, 1800 425 3800 अथवा 080 26599990 वरही आपली तक्रार नोंदवू शकतात.