देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना कर्जासाठी मोठमोठ्या ऑफर देत आहे. मात्र, कर्जाच्या थकबाकीचा आकडा 60000 कोटींवर गेला आहे. हा आकडा पुढील वर्षीच्या एनपीएमध्ये जाण्याची शक्यता असून असे झाल्यास एसबीआयसाठी तो एक बॉम्बच ठरणार आहे.
एवढ्या मोठ्या थकबाकीबाबत बँकेनेच खुलासा केला आहे. 2020-21 च्या आर्थिक वर्षात कर्ज परत येण्यास झालेला विलंब आणि लोन रिस्ट्रक्चरिंगचा आकडा मिळून 60000 कोटी रुपये असू शकतो, असे बँकेने म्हटले आहे. स्टेट बँकेने बुधवारी सप्टेंबर तिमाहीचा निकाव जाहीर केला आहे. यामध्ये सप्टेंबर तिमाहीत एसबीआयच्या फायद्यात जवळपास 52 टक्के मोठी वाढ झाल्याचे म्हटले आहे.
पत्नीचे ATM वापराल तर याद राखा! महिलेने गमावले 25000; SBI ने दावा नाकारला
बँकेला कोरोना लॉकडाऊन लोन मोरेटोरिअम काळात जवळपास 6,495 कोटी रुपयांच्या कर्जाचे रिस्ट्रक्चर करण्यासाठी अर्ज मिळाले आहेत. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे कर्ज फेडण्याच्या मुदतीत आणि अटींमध्ये बदल करणे. तसेच 2500 कोटी रुपयांचे रिटेल आणि छोटे लोन रिस्ट्रक्चर करण्याचे अर्ज मिळाले आहेत. रिटेलमध्ये लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याचे अर्ज हे सर्वाधिक एमएमएमईचे आहेत. याशिवाय जवळपास 42 मोठ्या कार्पोरेट ग्राहकांनी जवळपास 4000 कोटी रुपयांची कर्जे रिस्ट्रक्चर करण्यासाठी अर्ज केला आहे.
घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट
एवढेच नाही तर डिसेंबर 2020 पर्यंत 13000 कोटी रुपयांचे लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे. यानुसार कोरोना संकटात बँकेला 19495 कोटी रुपयांचे कर्ज रिस्ट्रक्चर करण्यासाठी अर्ज येऊ शकतात. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले की, याचा मोठा भाग हा कार्पोरेट आणि एमएसएमईकडून येणार आहे.
SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले
रिझर्व्ह बँकेने कार्पोरेट जगतासाठी डिसेंबर 2020 पर्यंतची वेळ दिली आहे. यामध्ये दोन वर्षांपर्यंत लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी एकमेकांसोबत डील करावी असे सांगितले आहे. जे लोक या योजनेत येतील त्यांचे कर्ज एनपीए मानले जाणार नाही. मात्र, बँका आपल्या रजिस्टरमध्ये याची प्रोव्हिजन करू शकणार आहेत. कोरोना संकटात एसबीआयचे 40 हजार कोटींचे कर्ज थकण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीत 6393 कोटी तर दुसऱ्या सहामाहित 14,388 कोटी रुपयांची थकबाकी होऊ शकते.