Join us

Stock To Buy: आई शप्पथ! FD पेक्षा पाच पट रिटर्न; SBI ने केली कमाल, गुंतवणूकदार वर्षभरात झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 8:36 PM

SBI Share Update: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे.

SBI Share Update: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. बँकेच्या स्टॉकने एका महिन्यात १६ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. इतकंच नाही तर बँकेचा शेअर अजूनही ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार करत आहे. आज SBI शेअर्स (SBI शेअर प्राइस) ८.३५ म्हणजेच १.५६ टक्क्यांच्या वाढीसह ५४२.१० वर बंद झाली. 

तज्ज्ञांच्या मतानुसार कर्जामध्ये एसबीआयचा बाजारातील हिस्सा वाढत आहे आणि बँकेच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा होत आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत SBI च्या शेअरवर नक्कीच दिसून येईल आणि हा शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो.

SBI कडून गुंतवणूकदारांवर पैशाचा वर्षावगेल्या एका आठवड्याच्या ट्रेडिंग सत्रात SBI च्या शेअरमध्ये ५.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या १ महिन्यात हा शेअर जवळपास १६ टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, ३ महिन्यांत १०.४१ टक्के वाढ झाली आहे, तर या स्टॉकने एका वर्षात २४.६५ टक्के चांगला परतावा दिला आहे. एवढेच नाही तर ३ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना ७५.७५ टक्के  इतका मजबूत परतावा दिला आहे.

FD पेक्षा 15 पट जास्त परतावा!जर एखाद्या गुंतवणूकदाराने SBI ची FD घेतली तर त्याला एका वर्षात ५.३० टक्के परतावा मिळेल, जर त्याने शेअर्स खरेदी केले तर त्याला २४.६५ टक्के परतावा मिळेल. त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यात ३ वर्षांसाठी एफडी घेतली तर त्याला ५.४५ टक्के दराने व्याज मिळेल, तर जर त्याने स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर त्याला ७५.७५ टक्के इतका चांगला परतावा मिळेल. म्हणजेच शेअर बाजारातील जोखीम असताना एसबीआयने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

ब्रोकरेज हाऊसही तेजीतब्रोकरेज हाऊसेस देखील SBI च्या बाबतीत उत्साही आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी SBI चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजहाऊसने या स्टॉकसाठी ६०० रुपयांपेक्षा जास्त किंमत दिली आहे. मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे की एसबीआय लोन बुकमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे आणि बँकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली आहे. ५ ऑगस्टपासून आरबीआयची बैठक होत आहे, ज्यामध्ये रेपो दराबाबत मोठ्या घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या बैठकीनंतर गुंतवणूकदारांच्या नजरा एसबीआयच्या शेअर्सवर असतील.

बँकेतील कर्जाचा वाटा वाढलाविशेष म्हणजे, एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, ज्याची बाजारात मजबूत पकड आहे. एसबीआयच्या बाजारपेठेचा अंदाज यावरून लावता येतो की, गेल्या चार वर्षांत कर्ज बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा हिस्सा ११.३० टक्क्यांनी घटला असताना, या कालावधीत एसबीआयचा हिस्सा ०.९० टक्क्यांनी वाढला आहे. एकूण कर्ज बाजारात बँकेचा हिस्सा २३ टक्के असताना, बँकेच्या ठेवींमधील बाजारातील वाटा गेल्या चार वर्षांत १.७ टक्क्यांनी वाढला आहे.

टॅग्स :एसबीआयबँकिंग क्षेत्रशेअर बाजारनिर्देशांक