Join us

SBI ने गृहकर्ज केलं स्वस्त, व्याजदर सहा वर्षाच्या निच्चांकावर

By admin | Published: November 02, 2016 1:15 PM

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जात मोठी कपात केली आहे. यामुळे व्याजदर सहा वर्षाच्या निच्चांकावर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जात मोठी कपात केली आहे. यामुळे व्याजदर सहा वर्षाच्या निच्चांकावर आलं आहे. कपात केल्यानंतर एसबीआयचं गृहकर्ज आता 9.1 टक्के झालं आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर ही कपात करण्यात आली आहे. एसबीआयच्या या नव्या योजनेमुळे कर्जदारांची हफ्त्यांची रक्कमही कमी होणार आहे. 
 
या नव्या योजनेनुसार महिलांना 9.1 टक्के व्याजदराने गृहकर्ज देण्यात येणार असून इतरांना 9.15 टक्के व्याजदराने मिळणार आहे. याअगोदर एसबीआय 9.25 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत होतं.
 
'एसबीआयने गृहकर्ज स्वस्त केल्याने 50 लाखांपर्यत गृहकर्ज घेतलं असल्यास ईएमआय 542 रुपये कमी द्यावा लागणार आहे. मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत ईएमआयमध्ये 1500 रुपयांची कपात झाली आहे', अशी माहिती एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितलं आहे. 
 
आयसीआयसीआय आणि एचडीएफसी यांच्याशी तुलना करता एसबीआयचा व्याजदर 0.2 टक्के कमी आहे. आयसीआयसीआय आणि एचडीएफसीचा गृहकर्ज व्याजदर सध्या 9.3 टक्के आहे.