नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त गेल्या महिन्यात मर्यादित कालावधीची विशेष ठेव योजना सुरू केली. या विशेष ठेव योजनेचे नाव एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट (SBI Platinum Deposits) आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेली ही योजना आज म्हणजेच 14 सप्टेंबर 2021 रोजी संपणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आज शेवटचा दिवस आहे. (sbi special fixed deposit fd scheme ends today 14 september)
एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट योजनेमध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत बँकेचे ग्राहक मुदत ठेवींवर 15 बेसिस पॉइंट (बीपीएस) अधिक व्याज मिळवू शकता. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एफडी मिळवायची असेल किंवा कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
डिपॉझिट योजनेची वैशिष्ट्ये...एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट अंतर्गत, ग्राहक 75 दिवस, 525 दिवस आणि 2250 दिवसांसाठी पैसे फिक्स्ड करू शकता. NRE आणि NRO टर्म डिपॉझिटसह डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिट्स (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत नवीन आणि नूतनीकरण डिपॉजिट्स देखील करता येतात.
सामान्य लोकांसाठी एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट जमा व्याज दर (SBI Platinum Deposits Interest Rates for the general public)
1) प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 75 दिवससध्याचा दर- 3.90 टक्केप्रस्तावित दर- 3.95 टक्के
2) प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 525 दिवससध्याचा दर- 5 टक्केप्रस्तावित दर- 5.10 टक्के
3) प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 2250 दिवससध्याचा दर- 5.40 टक्केप्रस्तावित दर- 5.55 टक्के
ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट जमा व्याज दर (SBI Platinum Deposits Interest Rates for senior citizens)
1) प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना 75 दिवससध्याचा दर- 4.40 टक्केप्रस्तावित दर- 4.45 टक्के
2) प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना 525दिवससध्याचा दर- 5.50 टक्केप्रस्तावित दर- 5.60 टक्के
3) प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना 2250 दिवसया कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 6.20 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.