Join us

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर! 'हा' नंबर त्वरित फोनमध्ये सेव्ह करा, सर्व कामे होतील फक्त एका कॉलवर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 3:57 PM

SBI Toll Free Number : बँकेनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले आहे की, फक्त एका नंबरद्वारे तुमचे सर्व महत्त्वाचे काम काही मिनिटांत होईल.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर आता बँक तुम्हाला एका नंबरवर कॉल किंवा मेसेज करून घरी बसून अनेक सुविधा देत आहे. तुम्हीही हा नंबर लगेच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडियाने 1800 1234 हा टोल फ्री नंबर जारी केला आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त एका कॉल आणि मेसेजद्वारे घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकाल. बँकेनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले आहे की, फक्त एका नंबरद्वारे तुमचे सर्व महत्त्वाचे काम काही मिनिटांत होईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ट्विटस्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या घरी सुरक्षित रहा. आम्ही तुम्हाला तुमच्या दारात बँकिंग सुविधा देत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व आवश्यक बँकिंग सुविधा तुमच्या दारात पोहोचवत आहे.

या नंबरवर करा कॉलग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 1800 1234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्हाला अनेक सुविधा मिळू शकतात. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुम्ही घरी बसून कोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकता, त्याबद्दल जाणून घ्या....  

SBI Toll Free Number-- तुमच्या खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकता- याशिवाय, तुम्ही तुमच्या शेवटच्या 5 व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता.- तुम्ही तुमची शिल्लक आणि शेवटचे ५ व्यवहार एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता.-  तुम्ही एटीएम कार्ड ब्लॉक आणि जारी करण्याची विनंती देखील करू शकता.- तुम्ही घरी बसल्या बसल्या एटीएम आणि ग्रीन पिन तयार करू शकता.- याशिवाय, तुम्ही तुमचे जुने एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर नवीन एटीएम कार्ड जारी करण्यासाठी अर्ज करू शकता.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँक