नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांना आवश्यक असलेली माहिती शेअर केली आहे. 22 नोव्हेंबरला INB/YONO/YONO लाइट वापर करतेवेळी बँकेच्या ग्राहकांना काही गैरसोय होऊ शकेल, असे बँकेने म्हटले आहे. जर तुम्ही हे अॅप्स वापरत असल्यास तुम्हाला आज व्यवहार करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे मोबाइल बँकिंग करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे असे काही घडल्यास ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही.
SBI ने ट्विटद्वारे दिली माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. 22 नोव्हेंबरला INB/YONO/YONO लाइट वापरताना बँकेच्या ग्राहकांना काही असुविधांचा सामना करावा लागू शकतो, असे बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे. जर तुम्ही हे अॅप्स वापरत आपल्यास काही तांत्रिक समस्या उद्भवू शकते.
We request our esteemed customers to bear with us as we upgrade our internet banking platform to provide for a better online banking experience.#SBI#StateBankOfIndia#ImportantNotice#InternetBanking#OnlineSBIpic.twitter.com/EA0ggVsO9D
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 21, 2020
अपग्रेड करत आहेत इंटरनेट बँकिंग
आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मला अपग्रेड करत आहोत, असे एसबीआयने सांगितले आहे. दरम्यान, बँकेने ही माहिती ग्राहकांना दिली आहे, जेणेकरुन जर ते काही त्वरित काम करत असतील तर ते याआधी पूर्ण करतील आणि 22 नोव्हेंबरला काही समस्या आल्यास त्यांना त्रास होणार नाही.
एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. जेणेकरून ग्राहक त्यानुसार त्यांच्या कामाचे नियोजन करू शकतील. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. अशा परिस्थितीत तुम्हाला जर तुमचे कोणतेही काम एसबीआयच्या नेटबँकिंगद्वारे करायचे असेल तर अडचण येऊ शकते.
योनो अॅपला सुद्धा तांत्रिक समस्या उद्भवेल
या अपग्रेड प्रक्रियेअंतर्गत योनो अॅप आणि योनो लाइट अॅपवरही परिणाम होईल, असे बँकेने म्हटले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकाने सर्व तयारी आधीपासूनच केल्या पाहिजेत.