Join us

SBI कडून 42 कोटी ग्राहकांना अलर्ट! आजच्या दिवशी 'ही' सुविधा मिळणार नाही...

By ravalnath.patil | Published: November 22, 2020 11:10 AM

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.

ठळक मुद्दे22 नोव्हेंबरला INB/YONO/YONO लाइट वापरताना बँकेच्या ग्राहकांना काही असुविधांचा सामना करावा लागू शकतो, असे बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांना आवश्यक असलेली माहिती शेअर केली आहे. 22 नोव्हेंबरला INB/YONO/YONO लाइट वापर करतेवेळी बँकेच्या ग्राहकांना काही गैरसोय होऊ शकेल, असे बँकेने म्हटले आहे. जर तुम्ही हे अ‍ॅप्स वापरत असल्यास तुम्हाला आज व्यवहार करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे मोबाइल बँकिंग करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे असे काही घडल्यास ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही.

SBI ने ट्विटद्वारे दिली माहितीस्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. 22 नोव्हेंबरला INB/YONO/YONO लाइट वापरताना बँकेच्या ग्राहकांना काही असुविधांचा सामना करावा लागू शकतो, असे बँकेने ट्विटमध्ये लिहिले आहे. जर तुम्ही हे अ‍ॅप्स वापरत आपल्यास काही तांत्रिक समस्या उद्भवू शकते.

अपग्रेड करत आहेत इंटरनेट बँकिंगआम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मला अपग्रेड करत आहोत, असे एसबीआयने सांगितले आहे. दरम्यान, बँकेने ही माहिती ग्राहकांना दिली आहे, जेणेकरुन जर ते काही त्वरित काम करत असतील तर ते याआधी पूर्ण करतील आणि 22 नोव्हेंबरला काही समस्या आल्यास त्यांना त्रास होणार नाही.एसबीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. जेणेकरून ग्राहक त्यानुसार त्यांच्या कामाचे नियोजन करू शकतील. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. अशा परिस्थितीत तुम्हाला जर तुमचे कोणतेही काम एसबीआयच्या नेटबँकिंगद्वारे करायचे असेल तर अडचण येऊ शकते.

योनो अ‍ॅपला सुद्धा तांत्रिक समस्या उद्भवेलया अपग्रेड प्रक्रियेअंतर्गत योनो अ‍ॅप आणि योनो लाइट अ‍ॅपवरही परिणाम होईल, असे बँकेने म्हटले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकाने सर्व तयारी आधीपासूनच केल्या पाहिजेत.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाबँक