Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न, स्कॅमर्स पाठवतायेत असे मेसेज, तुम्ही 'ही' चूक करू नका

SBI युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न, स्कॅमर्स पाठवतायेत असे मेसेज, तुम्ही 'ही' चूक करू नका

SBI : एसबीआयच्या नावाने हा मेसेज पाठवून फसवणूक करणारे लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:52 PM2022-11-11T12:52:40+5:302022-11-11T12:56:00+5:30

SBI : एसबीआयच्या नावाने हा मेसेज पाठवून फसवणूक करणारे लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत.

sbi user on alert pan card update sms is fake | SBI युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न, स्कॅमर्स पाठवतायेत असे मेसेज, तुम्ही 'ही' चूक करू नका

SBI युजर्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न, स्कॅमर्स पाठवतायेत असे मेसेज, तुम्ही 'ही' चूक करू नका

नवी दिल्ली : इंटरनेटमुळे लोकांची अनेक कामे सुलभ झाली आहेत. पण, अनेकजण त्याचा चुकीचा वापर करत आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर करत आहेत. दरम्यान, एक मेसेज बऱ्याच एसबीआयबँक धारकांना पाठवला जात आहे.

एसबीआयच्या नावाने हा मेसेज पाठवून फसवणूक करणारे लोकांना पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगत आहेत. दरम्यान, फसवणूक करणारे सामान्य लोकांना फसवण्यासाठी असा सापळा रचतात की, ते सहजपणे त्यात अडकतात. एसबीआयच्या ग्राहकांची संख्या जास्त असल्याने फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

'प्रिय ग्राहक, तुमचे SBI YONO अकाउंट आज बंद झाले आहे. लगेच संपर्क साधा आणि तुमचा पॅन नंबर अपडेट करा, असे मेसेजमध्ये असे लिहिले आहे. त्यामुळे असा मेसेज मिळाल्यावर ग्राहक त्रस्त होऊ शकतात आणि चुकून फसवणूक करणार्‍याच्या जाळ्यात अडकतात. दरम्यान, या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत पीआयबीने हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे.

तसेच, तुम्ही अशा मेसेज किंवा मेलला उत्तर देऊ नये. तुम्हाला असा कोणताही मेल किंवा मेसेज आला तर तुम्ही त्याची माहिती report.phishing@sbi.co.in वर शेअर करू शकता, असेही म्हटले आहे. दरम्यान, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नये.

'या' चुका करू नका
सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सावध राहूनच तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवता येते. काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ऑनलाइन पेमेंटसाठी, तुम्हाला फक्त तुमचा UPI पिन टाकावा लागेल. दुसरीकडे, UPI पिन फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो.

पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी तुम्हाला पिनची आवश्यकता नाही. ग्राहकांनी आपला UPI पिन कधीही दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नये. तुम्हाला कधी काही जाणून घ्यायचे असेल तर बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर शोधा. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने गुगलवर याचा शोध घेऊ नका. अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.

Web Title: sbi user on alert pan card update sms is fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.