SBI Yono SMS Phishing Scam: इंटरनेटवर फिशिंग घोटाळे खूप सामान्य आहेत. गेल्या काही वर्षांपासून, अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये खातेधारक त्यांच्या बँक खात्यांचे तपशील शेअर करतात आणि सायबर गुन्हेगार पैसे लाटतात. आता अशीच घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसोबत घडत आहे. अनेक SBI खातेधारकांना SBI वेबपेज म्हणून दाखवलेल्या लिंकसह त्यांचा पॅन नंबर अपडेट करण्याचा संदेश मिळत आहे. परंतु प्रत्यक्षात हा एक फिशिंग घोटाळा आहे. तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
SBIच्या खातेधारकांच्या मोबाइलवर येतोय फेक मेसेजSBI खातेधारकांना एक SMS प्राप्त होत आहे की त्यांनी दिलेल्या लिंकवर जर क्लिक केले नाही तर त्यांचे 'YONO' खाते ब्लॉक केले जाईल. किंवा जर त्यांनी त्यांचा पॅन क्रमांक अपडेट केला नाही तर खाते बंद होईल. YONO हे SBI चे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. मेसेजमधील लिंकवर खातेधारकांना संवेदनशील माहिती भरण्यास सांगितली जाते. SBI पेज म्हणून संबंधित माहिती चित्रित केली जाते. जर खातेधारकाने त्याचे क्रेडेन्शियल नमूद केले आणि ते थेट हॅकरपर्यंत पोहोचले. तर तो त्याचा गैरवापर करू शकतो.
चुकूनही लिंकवर क्लिक करू नकामेसेजच्या माध्यमातून केला जाणारा हा एक फिशिंग हल्लाच आहे. फिशिंग हल्ला बँक खात्याशी संबंधित असल्याने, कोणत्याही परिस्थितीत लिंकवर क्लिक करु नये. कारण तुम्ही लिंकवर क्लिक केल्यास आणि कोणतीही संवेदनशील माहिती टाकल्यास तुमचे पैसे लाटले जाण्याची शक्यता आहे.
SBI ने खातेधारकांना दिला सल्लाफेक मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचल्याचे SBI च्या निदर्शनास येताच त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. बँकेने नमूद केले आहे की त्यांची आयटी सुरक्षा टीम यावर योग्य ती कारवाई करेल. ज्यात ग्राहकांची वैयक्तीक आणि बँक खात्यासंदर्भात माहिती विचारण्यात येईल अशा ईमेल/एसएमएस/कॉल/एम्बेडेड लिंक्सना प्रतिसाद न देण्याचा सल्ला बँकेने दिला आहे. बँका सहसा कोणताही OTP संदेश किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर तुम्ही "report.phishing@sbi.co.in" वर तक्रार करू शकता किंवा कारवाई करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधू शकता.