Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा!'; बँकेनं सांगितलं, 'असं होऊ शकत नाही, सतर्क राहा'

'QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा!'; बँकेनं सांगितलं, 'असं होऊ शकत नाही, सतर्क राहा'

QR Code Scam : भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि कोणतेही क्यूआर (QR) स्कॅनर करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:22 PM2022-03-25T16:22:43+5:302022-03-25T16:24:40+5:30

QR Code Scam : भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि कोणतेही क्यूआर (QR) स्कॅनर करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

sbi warns customers against qr code scam this is what all you need to know | 'QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा!'; बँकेनं सांगितलं, 'असं होऊ शकत नाही, सतर्क राहा'

'QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा!'; बँकेनं सांगितलं, 'असं होऊ शकत नाही, सतर्क राहा'

नवी दिल्ली : ऑनलाइन पेमेंट करण्याचे आपले फायदे सुद्धा आहेत आणि तोटे देखील आहेत. याबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. जर सतर्क न राहता ऑनलाइन पेमेंट किंवा मोबाईल पेमेंटचा वापर केल्यास फसवणूक होण्यास जास्त वेळ लागत नाही.

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि कोणतेही क्यूआर (QR) स्कॅनर करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. QR कोड स्कॅन करणे म्हणजे तुम्ही पैसे पाठवत आहात आणि QR कोड स्कॅन केल्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने केले ट्विट
QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा?
हा चुकीचा नंबर आहे. QR कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगा! तुम्ही स्कॅन करण्यापूर्वी विचार करा, तुम्ही कोणताही अज्ञात QR कोड स्कॅन केला आहे का, तो अनव्हेरिफाइड QR कोड आहे का. सावध राहा आणि सुरक्षित राहा.

QR कोडचा उपयोग काय?
QR स्कॅनचा वापर नेहमी पैसे देण्यासाठी केला जातो आणि पैसे मिळविण्यासाठी नाही. त्यामुळे, जर तुम्हाला कधीही QR कोड स्कॅन करून पैसे मिळवण्यास सांगणारा मेसेज किंवा ईमेल आला, तर तो कोड कधीही स्कॅन करू नका. साहजिकच हा घोटाळा असेल. तुम्ही QR कोड स्कॅन केल्यास, तुमचे बँक खाते रिकामे व्हायला वेळ लागणार नाही.

QR कोडचा इतिहास
QR कोड एक टू-डायमेंशनल मशीन आहे, ज्यामध्ये बारकोड वाचण्याची क्षमता आहे. हे तंत्रज्ञान पॉइंट ऑफ सेल (विक्री केंद्र) येथे मोबाईल पेमेंट करण्यासाठी वापरले जाते. QR कोडमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवली जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा शोध 90 च्या दशकात  Denso Wave या जपानी कंपनीने लावला होता.

Web Title: sbi warns customers against qr code scam this is what all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.