नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. स्टेट बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन कोट्यवधी ग्राहकांना जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही क्यूआर कोड (QR Code) किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करू नका, असं आवाहन बँकेने केले आहे. जर चुकुनही तुम्ही कोड स्कॅन केला तर तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे जाऊ शकतात. ऑनलाईन बँकिंगचा वापर करत असताना फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत असल्याने ग्राहकांना सतर्क करण्यात येत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला काही पैसे मिळणार नाहीत. तर फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. ऑनलाईन बँकिंगचा वापर करताना ग्राहक म्हणून फसवणूक होत आहे किंवा फसवणुकीचा संशय आल्यास थेट बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि त्याबाबतत माहिती द्यावी. फसवणूक होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या मेसेज पासून सावध राहा. याआधीही डेबिट कार्डवरून होणाऱ्या फ्रॉड संबंधी इशारा देण्यात आला होता.
You don’t receive money when you scan a QR code. All you get is a message that your bank account is debited for an ‘X’ amount. Do not scan #QRCodes shared by anyone unless the objective is to pay. Stay alert. #StaySafe. https://t.co/EXGQB7YFT9#QRCodes#InternetBanking
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 27, 2021
QR कोडद्वारे अशी होते फसवणूक
स्टेट बँक ऑफ इंडियाने क्यू आर कोडद्वारे कशी फसवणूक होते हे समजावून सांगण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कशाप्रकारे क्यू आर कोड पाठवतात आणि पैसे उकळतात हे समजावून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण ज्यावेळी दुसऱ्याचा क्यू आर कोड स्कॅन करतो तो पैसे पाठवण्यासाठी असतो. आपण स्वत: क्यू आर कोड स्कॅन केल्यास पैसे स्वीकारले जात नाहीत तर ते आपल्या खात्यातून जातात.
महत्त्वाची माहिती करू नका शेअर
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी कोणालाही अकाऊंट नंबर, पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाईल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट रिकामं होऊ शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
India Post GDS Maharahstra Recruitment 2021 : खूशखबर! महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?#PostOffice#Jobs#Maharashtra#JobAlerthttps://t.co/ITrB3rfRE5
— Lokmat (@MiLOKMAT) April 28, 2021