सध्या आपल्यापैकी WhatsApp चा वापर करत नसतील अशा क्वचितच काही व्यक्ती असतील. अनेक कामांसाठी आजकाल व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. काही बँका याद्वारे बँकिंगच्या सेवाही पुरवतात. यादरम्यान आता देशातील मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंदेखील (State Bank Of India) व्हॉट्सअॅप बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. तुम्ही चॅटद्वारे बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंटसह अनेक बँकिंग सुविधांचा लाभ याद्वारे घेऊ शकता.
व्हॉट्सअॅप बँकिंगद्वारे सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्टर करावं लागणार आहे. तुम्हाला WAREG असं टाईप करून पुढे स्पेस देत आपला अकाऊंट नंबर लिहावा लागेल. त्यानंतर हा मेसेज 7208933148 या क्रमांकावर पाठवावा लागेल. परंतु बँकेत रजिस्टर असलेल्याच मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला हा मेसेज पाठवावा लागेल. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्टेट बँकेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून तुम्हाला एक मेसेज येईल. 9022690226 हा नंबर तुम्ही सेव्हही करू शकता.
चॅटद्वारे माहिती
तुम्हाला चॅटद्वारे माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम Hi किंवा Hi SBI असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून काही ऑप्शन्स येतील. त्यापैकी कोणत्या सुविधेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पर्याय निवडू शकता.