Join us  

SBI व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवणार पेन्शन स्लिप आणि बँक बॅलन्सची माहिती! जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 3:34 PM

WhatsApp : स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअ‍ॅप सेवा (SBI WhatsApp Service) सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या नंबरवर फक्त 'hi' पाठवावा लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेने दिली आहे.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेन्शन स्लिप (Pension Slip)पाठवण्याची घोषणा केली आहे. ही नवीन सुविधा ग्राहकांसाठी बँकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम करेल, असे बँकेचे म्हणणे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअ‍ॅप सेवा (SBI WhatsApp Service) सुरू करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या नंबरवर फक्त 'hi' पाठवावा लागेल. याबाबतची संपूर्ण माहिती बँकेने दिली आहे.

आजकाल बहुतांश बँका आणि इतर कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देतात. याच क्रमाने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली आहे. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking) किंवा योनो एसबीआय (Yono SBI) अ‍ॅपद्वारे रजिस्ट्रेशन करावी लागेल. 

अशी सुरू करा एसबीआयची व्हॉट्सअ‍ॅप सेवा पहिल्यांदा बँकेच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबर +919022690226 वर 'hi' लिहून पाठवा. येथे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज मिळण्यास सुरुवात होईल. तुम्ही येथे दिलेल्या पर्यायांमधून बँक बॅलन्सची चौकशी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिपमधून पेन्शन स्लिपचा पर्याय निवडू शकता. यानंतर, तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या स्लिपबद्दल सांगा. ही प्रक्रिया पूर्ण होताच, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर पेन्शन स्लिप मिळेल.

बँक बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट सुद्धा व्हॉट्सअ‍ॅपवरआता स्टेट बँक ऑफ इंडियाही आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बँक बॅलन्स तपासण्याची सुविधा देत आहे. तसेच, याद्वारे आपण मिनी स्टेटमेंटची रिक्वेस्ट देखील करू शकता. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी खातेदाराला आधी रजिस्ट्रेशन करावी लागेल. बँकेची ही सेवा ग्राहकांना वर्षातील 365 दिवसांमध्ये 24×7 उपलब्ध आहे.

इंटरनेट बँकिंगद्वारे असे करा रजिस्ट्रेशनस्टेट बँक ऑफ इंडिया ऑनलाइनमध्ये साइन इन करा आणि 'Requests and Enquiries' या पर्यायावर जा. 'ऑनलाइन रजिस्ट्रेशन' वर क्लिक करा आणि नंतर खाते क्रमांक निवडा. येथे नॉमिनी व्यक्तीची माहिती भरा आणि सबमिट करा. याशिवाय, तुम्ही ही प्रक्रिया एसबीआयच्या मोबाईल बँकिंग अॅप Yono द्वारे देखील करू शकता.

टॅग्स :एसबीआयव्हॉट्सअ‍ॅपतंत्रज्ञान