मुंबई : कर्ज थकवलेल्या दोन कर्जदारांची एकूण २,४९० कोटी रूपयांची मालमत्ता स्टेट बँक आॅफ इंडिया विकणार असून त्यासाठी निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील. कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तांच्या विक्रीसाठीच्या बँकेच्या नव्या धोरणानुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे बँकेने निविदांच्या दस्तावेजात म्हटले आहे.बँकेचे बाँबे रेयॉन फॅशन्स लिमिटेडकडे २,२६०.७९ कोटी तर शिवम धातू उद्योग प्रायव्हेट लिमिटेडकडे २२९.३२ कोटी रूपये थकले आहेत.बाँबे रेयॉनकडील थकलेल्या कर्जात इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा समावेश नाही. ई-निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील. स्टेट बँकेने यावर्षी जूनअखेर दिलेल्या कर्जाच्या १०.६९ टक्के हे थकीत कर्ज असून ते गेल्या वर्षी ९.९७ टक्के होते. रूपयांमध्ये विचार केला तरथकीत कर्ज १,८८,०६८ कोटी रूपयांवरून २,१२,८४० कोटी रूपये झाले आहे.
कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:38 AM