Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI YONO App : 'एसबीआय'कडून स्वस्तात ट्रेन तिकीट बुक करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

SBI YONO App : 'एसबीआय'कडून स्वस्तात ट्रेन तिकीट बुक करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

SBI YONO App : SBI ने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, योनो अ‍ॅपद्वारे (YONO App) रेल्वे तिकीट बुक करून तुम्ही स्वस्त तिकिटे मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:35 PM2022-09-23T14:35:22+5:302022-09-23T14:39:39+5:30

SBI YONO App : SBI ने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, योनो अ‍ॅपद्वारे (YONO App) रेल्वे तिकीट बुक करून तुम्ही स्वस्त तिकिटे मिळवू शकता.

SBI YONO App : Opportunity to book cheap train tickets from 'SBI'; Know, in detail... | SBI YONO App : 'एसबीआय'कडून स्वस्तात ट्रेन तिकीट बुक करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

SBI YONO App : 'एसबीआय'कडून स्वस्तात ट्रेन तिकीट बुक करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात स्वस्तात रेल्वे तिकीट बुकिंगची ऑफर दिली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, योनो अ‍ॅपद्वारे (YONO App) रेल्वे तिकीट बुक करून तुम्ही स्वस्त तिकिटे मिळवू शकता.

नोटिफिकेशननुसार, ग्राहकांनी SBI YONO अ‍ॅपद्वारे आयआरसीटीसी (IRCTC) साइटवर ट्रेन तिकीट बुक केल्यास त्यांना कोणतेही पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागणार नाही. SBI ने म्हटले आहे की YONO अ‍ॅपद्वारे तिकिटांच्या खरेदीवर पेमेंट गेटवे शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल. दरम्यान, IRCTC वेबसाइटवर रेल्वे तिकीट बुक करताना, सर्व गेटवे कंपन्या 30 रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. मात्र, जर तुम्ही हे तिकीट SBI च्या YONO अ‍ॅपद्वारे खरेदी केले तर हे शुल्क आकारले जाणार नाही.

SBI ने YONO अ‍ॅप आपल्या ग्राहकांना एकाच अ‍ॅपवर सर्व बँकिंग आणि व्यवहार सुविधा प्रदान करण्यासाठी सादर केले. YONO अ‍ॅप पहिल्यांदा 2017 मध्ये सुरू झाले आणि नंतर या अ‍ॅपमध्ये आणखी काही फीचर जोडून YONO 2.0 अ‍ॅप लाँच करण्यात आले. या अ‍ॅपद्वारे कर्ज अर्ज, पैशांचे व्यवहार आणि चेकबुक किंवा कार्डशी संबंधित सेवांचा लाभ घेता येईल.

YONO अ‍ॅप कसे करावे तिकीट बुकिंग?
- सर्वात पहिल्यांदा SBI YONO अ‍ॅप उघडा आणि बुक आणि ऑर्डर सेक्शनमध्ये जा.
- येथे तुम्हाला IRCTC चा आयकॉन दिसेल.
- यावर क्लिक केल्यानंतर IRCTC लॉगिन पेज उघडेल.
- त्यावर तयार केलेल्या तुमच्या आयडीने लॉग इन करा आणि तिकीट बुक करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती भरा.
- यानंतर, तुम्ही पेमेंट पेजवर जाल आणि तुमचे कार्ड किंवा बँक खाते डिटेल्स भरून पेमेंट कराल.
- अ‍ॅपवर तिकिटासाठी पैसे भरताना, तुम्हाला दिसेल की SBI तुमच्याकडून पेमेंट गेटवे शुल्क घेत नाही.

Web Title: SBI YONO App : Opportunity to book cheap train tickets from 'SBI'; Know, in detail...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.