नवी दिल्ली- सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्तानं ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. बँकेनं पर्सनल लोनवरची प्रोसेसिंग फी शून्य केली आहे. ग्राहकांना आता कर्ज घेण्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या ऑफरचा फायदा 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. जेव्हा तुम्ही कर्ज घेता, त्यावेळी त्यासंबंधी इतरही शुल्क द्यावे लागते. त्यात व्याजाचे पैसे, प्रोसेसिंग फी, एडमिनिस्ट्रेटिव्ह, प्री-पेमेंटसह अन्य गोष्टींचा समावेश असतो. एसबीआयनं कर्ज घेण्यातल्या प्रक्रियेतील शुल्क संपवले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत पर्सनल लोन घेणा-यांना यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क मोजावं लागणार नाही.
बँका या 10 ते 18 टक्क्यांनुसार पर्सनल लोन ग्राहकाला देत असतात. पर्सनल लोनवरही व्याजाचे दर तुमच्या उत्पन्नानुसार ठरतात. तुम्ही नोकरी करता, पगार किती आहे. तसेच तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेताय त्या बँकेत तुमचं सॅलरी अकाऊंट आहे काय, यावरही तुमच्या लोनवरचं शुल्क निर्भर आहे. एसबीआयच्या माहितीनुसार, पर्सनल लोनवरचा इंटरेस्ट रेड दर दिवशी अन् महिन्याला बदलत असतो. पर्सनल लोनवरचा इंटरेस्ट रेट उर्वरित कर्जाच्या रकमेवर निर्भर असतो. त्यामुळे तुमच्या कर्जावरचं व्याजही कमी होतं. पर्सनल लोनमध्ये सुरुवातीला तुमच्या कर्जाच्या रकमेवर महिन्याचा इंटरेस्ट रेट कॅलक्युलेट केला जातो. तसेच या इंटरेस्ट रेटचा तुमच्या ईएमआयवरही फरक पडत असून, ग्राहकांना याचा फायदा पोहोचणार आहे.
Now, avail a Personal Loan from SBI and pay zero processing fees! Avail the amazing benefit before 30.11.2018. To know more & apply now, visit: https://t.co/lvKmCCxoqr#SBI#StateBankOfIndia#Banking#PersonalLoans#Loans#DreamHoliday#Wedding#Emergencypic.twitter.com/FHXUTNZIoX
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 2, 2018