लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाने पैसे काढणे व आॅनलाइन व्यवहार यावरील शुल्करचनेत बदल केला असून, त्याची अंमलबजावणी सुरूही केली आहे. या सेवा महागल्या आहेत. ‘एसबीआय मोबाईल बडी’ अॅपद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर २५ रुपये शुल्क लागेल. कार्ड नसले तरी पैसे काढण्याची सुविधा हे अॅप देते. झिरो बॅलन्सवर चालणाऱ्या बेसिक सेव्हिंग्ज खात्यातून चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क लागेल. पैसे एटीएममधून काढले वा शाखेतून काढले तरी शुल्क द्यावे लागेल. सेव्हिंग्ज खात्यातून पैसे काढणे महानगरांत ग्राहकांसाठी आठ वेळा (एसबीआय एटीएमवर पाचदा व अन्य एटीएमवर तीनदा) व बिगर महानगरांत १0 वेळा पैसे काढणे नि:शुल्क असेल. त्यापुढच्या व्यवहारांवर शुल्क लागेल.इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे पैसे हस्तांतरीत करण्याच्या प्रत्येक व्यवहारावर शुल्क लागेल. १ लाखांपर्यंत ५ रुपये व सेवाकर, २ लाखांपर्यंत १५ रुपये व सेवा कर आणि २ ते ५ लाखांवर २५ रुपये व सेवा कर असे शुल्क लागेल. सरकार नागरिकांना कॅशलेस होण्याचा आग्रह धरीत असताना एसबीआय मात्र कॅशलेस व्यवहारांवर शुल्क लावीत आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. चेकबुकसाठीही पैसेयापुढे बेसिक सेव्हिंग्ज खातेधारकास चेकबुक मोफत मिळणार नाही. १0 चेकच्या बुकसाठी ३0 रुपये व सेवाकर, २५ पानी चेकच्या बुकसाठी ७५ रुपये व सेवाकर आणि ५0 पानी चेकबुकसाठी १५0 रुपये व सेवाकर असे शुल्क लागेल.खराब नोटा बदलण्यासाठीही शुल्कखराब नोटा बदलून घेण्यासाठीही शुल्क लागेल. २0 नोटा अथवा ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नोटा बदलण्यासाठी २ रुपये व सेवाकर असे शुल्क लागेल.
स्टेट बँकेच्या सेवा महागल्या
By admin | Published: June 02, 2017 1:31 AM