Join us

दुसऱ्या तिमाहीत पाच पटीने वाढला अल्पपतपुरवठा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 3:51 AM

रिकव्हरीचे संकेत, परतफेडही समाधानकारक

मुंबई : देशातील अल्प पतपुरवठ्याचे प्रमाण पाच पटीने वाढले असून, एकूण कर्ज प्रकरणातही चौपटीने वाढ झाली आहे. मोरॅटोरियमनंतर कर्ज वितरणासोबतच परतफेडीचेही  प्रमाण वाढले आहे. आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येत  असल्याचे हे संकेत आहेत. दुसऱ्या तिमाहीअखेर एकूण अल्प पतपुरवठ्याचे आकडे समोर आले  आहेत. सप्टेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाही अखेरपर्यंत एकूण २,३१,७७८ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत  १४.९० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एकूण १०.५० कोटी जणांना  कर्जवाटप  करण्यात आले आहे. त्यापैकी ५.७१ कोटी खाती नवीन आहेत. गेल्या तिमाहीच्या तुलनेत परिस्थितीत  सुधारणा झाली आहे. पाच राज्ये पतपुर‌वठ्यामध्ये आघाडीवरबिगर बँकिंग कंपन्यांकडूनही होणाऱ्या अल्प पतपुरवठ्यातही दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. एकूण ३२ लाख खात्यांमध्ये १०६१७ कोटींचे  कर्ज वितरित करण्यात आले आहे. खातेनिहाय सरासरी कर्जवितरणातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये या क्षेत्रात आणखी  सुधारणा अपेक्षित असून, धोरणात्मक  पाठिंबा अपेक्षित असल्याचे  डॉ. मिश्रा यांनी सांगितले. अल्प पतपुरवठ्यात बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडीशा ही पाच राज्ये आघाडीवर आहेत. एकूण कर्ज पुरवठ्यापैकी ५१ टक्के वितरण या राज्यांमध्ये झाले आहे.