Post Office Scam Alert : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं (IPPB) आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केलाय. पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांची बँक खातीही फसवणुकीच्या मेसेजच्या माध्यमातून रिकामी केली जात आहेत. अशावेळी जर तुमचं खातंही पोस्ट ऑफिसमध्ये उघडलं असेल तर तुम्हाला याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्यासोबत होणारी फसवणूक टाळू शकाल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
ग्राहकांना येताहेत मेसेज
फसवणूक करणारे पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना पॅनकार्डशी संबंधित मेसेजेस पाठवत आहेत. या मेसेजमध्ये पॅन कार्ड डिटेल्स अपडेट न केल्यामुळे त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तसंच या मेसेजसोबत एक लिंकही शेअर केली जात आहे, ज्याद्वारे त्यांना आपला पॅन कार्ड नंबर अपडेट करू शकता येत आहे. परंतु हे मेसेज फसवणुकीचे मेसेज आहेत. अशावेळी तुम्हालाही असा मेसेज येत असेल तर सावध व्हा आणि मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
या टीप्स करा फॉलो
आयपीपीबीनं आपल्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ग्राहक त्यांची फसवणूक कशी टाळू शकतात हे स्पष्ट केलंय. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबद्दल.
- आपला पासवर्ड नियमितपणे अपडेट करा.
- बनावट ग्राहक सेवा क्रमांकापासून बचाव करा.
- आपल्या खात्याचा तपशील तपासत राहा.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
- सार्वजनिक ठिकाणचं वाय-फाय वापरू नका.
- बँकिंग कम्युनिकेशन्सची सत्यता नेहमी पडताळून पाहा.