Lokmat Money > बिझनेस न्यूज > विद्वान, कवी यांनाही आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार!

विद्वान, कवी यांनाही आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार!

भोपाळ : वार्षिक २० लाख रुपये कमावणारे अतिथी शिक्षक, अतिथी विद्वान आणि दुसऱ्यांच्या कार्यक्रमांत हजेरी लावणारे लाइफ स्टाइल गुरू ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:23 AM2022-08-23T07:23:52+5:302022-08-23T07:24:11+5:30

भोपाळ : वार्षिक २० लाख रुपये कमावणारे अतिथी शिक्षक, अतिथी विद्वान आणि दुसऱ्यांच्या कार्यक्रमांत हजेरी लावणारे लाइफ स्टाइल गुरू ...

Scholars and poets will also have to pay 18 percent GST now | विद्वान, कवी यांनाही आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार!

विद्वान, कवी यांनाही आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार!

भोपाळ :

वार्षिक २० लाख रुपये कमावणारे अतिथी शिक्षक, अतिथी विद्वान आणि दुसऱ्यांच्या कार्यक्रमांत हजेरी लावणारे लाइफ स्टाइल गुरू व कवी  यांना आयकराव्यतिरिक्त आता १८ टक्के जीएसटीसुद्धा द्यावा लागणार आहे. याआधी त्यांना जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले होते. याशिवाय सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील शुद्ध केलेले पाणी आता शुद्धिकृत पाण्याच्या श्रेणीच्या बाहेर राहील. त्यावरील १८ टक्के जीएसटी हटविण्यात आला आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाने ताज्या स्पष्टीकरणात ही माहिती दिली आहे. त्यानुसार, आता बांधकाम खर्चात कपात होईल. कारण विना मिरर पॉलीसच्या नेपा स्टोनवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून घटवून ५ टक्के करण्यात आला आहे.

२५ लाखांच्या कमाईवर लागेल ५.९७ लाख कर
अतिथी विद्वान अथवा कवी यांची वार्षिक कमाई २५ लाख रुपये असेल, तर त्यांना सध्या आयकर आणि उपकराच्या स्वरूपात ५.०७ लाख रुपयांचा कर द्यावा लागतो. मात्र आता त्यांना १८% जीएसटीच्या स्वरूपात आणखी ९० हजार रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे त्यांच्यावर बसणारा कर ५.९७ लाख रुपये होईल. 

विना फास्टॅग वाहनांना दिलासा
विना बॅटरीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या टूरसाठी एक वेळ भाड्यावर घेतल्या जाणाऱ्या वाहनांवर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या (आरसीएम) माध्यमातून लागणाऱ्या ५ टक्के जीएसटीत सूट देण्यात आली आहे.  टोलनाक्यांवर विना फास्टॅग वाहनांवर १८% जीएसटी लावण्यात येत होता. तो आता हटविला आहे.

Web Title: Scholars and poets will also have to pay 18 percent GST now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी