कल कॉन्व्हेन्ट अँड स्कूल (फोटो के - डीजीटल, कमला कॉन्व्हेन्ट)नागपूर : आस्था सोशल असोसिएशन द्वारा संचालित शेषनगर, खरबी रोड येथील कमल कॉन्व्हेन्ट अँड स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ह्युमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अरूप मुखर्जी, नंदनवन पोलीस स्टेशनचे ढोले, बिडवई, नंदनवार, रवींद्र गायकी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे सचिव दिनेश गायकी यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या सुविधा आणि विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. स्कूलच्या प्राचार्य वृषाली गायकी यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आत्मरक्षा करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा प्रारंभ मुलींच्या कराटे प्रात्यक्षिकाने करण्यात आला. लहान विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे संचालन सागर सोनवानी व शशी विश्वकर्मा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना रामटेके, शिल्पा गडेकर, अलका पारसे, शीतल रणदिवे, कीर्ती रामटेके, रूपाली देवगडे, निशा सातमोहनकर, सविता काटोले संगीता मिश्रा, वनिता बोरकर, रत्नमाला कांबळे, वैशाली मोटघरे आदींनी प्रयत्न केले.
शाळा महाविद्यालय
कमल कॉन्व्हेन्ट अँड स्कूल (फोटो के - डीजीटल, कमला कॉन्व्हेन्ट)
By admin | Published: February 6, 2015 10:35 PM2015-02-06T22:35:23+5:302015-02-06T22:35:23+5:30