Join us  

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! पेट्रोल-डिझेल महागण्याचीच शक्यता? कंपन्या कमाईत मग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 6:09 AM

दर न घटविण्यासाठी सापडले नवे कारण

नवी दिल्ली : भारताला गेल्या वर्षभरात रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत आहे. कंपन्यादेखील काही महिन्यांपासून पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रीतून नफा कमावित आहे. मात्र, तरीही पेट्राेल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. 

आता रशियाच्या तेलावरील सवलतही कमी झाली असून दर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेट्राेल आणि डिझेलचे दर कमी हाेण्याची शक्यता मावळली असून, उलट दरवाढीचीच भीती वाढली आहे.

युक्रेन युद्धानंतर जी-७ देशांनी रशियाच्या कच्च्या तेलावर ६० डाॅलर प्रतिबॅरलची मर्यादा टाकली हाेती. मात्र, सध्या रशियन कच्च्या तेलाचे दर त्यापेक्षा जास्त झाले आहेत. तर, दुसरीकडे भारताला मिळणारी सवलतही कमी झाली आहे. 

याशिवाय रशियाकडून भारतात कच्चे तेल आणण्यासाठीदेखील जास्त खर्च येत आहे. अशा स्थितीतही आखाती देशांच्या तुलनेत रशियन तेल सुमारे मालवाहतुकीचा खर्च वगळूनही १० ते १२ डाॅलर स्वस्तात मिळत आहे. तरीही तेल कंपन्या दरकपात करण्याच्या तयारीत नाहीत. 

अशी घटली सवलत (प्रतिबॅरल)

    मे २०२२            ३० डाॅलर    जुलै २०२२            २० डाॅलर    डिसेंबर २०२२            १२ डाॅलर    मार्च २०२३            १० डाॅलर    जुलै २०२३            ४ डाॅलर६२.२ डाॅलर प्रतिबॅरल या दराने सध्या कच्चे तेल भारताला मिळत आहे. २२ लाख बॅरल दरराेज एवढे कच्चे तेल भारताने रशियाकडून जून महिन्यात आयात केले.

कच्चे तेल्याचा वाहतुकीचा खर्च

देश         खर्चाचे प्रमाण   अंतिम किंमत (प्रतिबॅरल)रशिया        ४५ टक्के       ७० डाॅलर इराक        २१ टक्के       ७५ डाॅलरसाैदी अरब       १४ टक्के       ८४ डाॅलरयूएई              ७ टक्के       ८५ डाॅलरखासगी कंपन्यांची बाजारभावानुसार तेलविक्री देशातील काही खासगी तेल कंपन्यांनी बाजारभावानुसार पेट्राेल आणि डिझेलची विक्री गेल्या महिन्यात सुरू केली. या कंपन्या सरकारी कंपन्यांपेक्षा १ रुपये स्वस्तात पेट्राेल विक्री करीत आहेत. 

तेल कंपन्या कमावणार १ लाख काेटी रुपये

 तेल कंपन्यांना स्वस्तात तेल मिळाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात १ लाख काेटी रुपयांचा नफा कमावू शकतात, असा अंदाज आहे. क्रिसिलने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी ३० टक्के स्वस्तात तेल मिळूनही दर कमी न केल्यामुळे यावर्षी नफा वाढणार असल्याचे क्रिसिलने म्हटले. ६० हजार काेटी रुपये सरासरी नफा २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षांत कंपन्यांनी प्राप्त केला. ३३ हजार काेटींचा नफा २०२२-२३ या आर्थिक वर्षात झाला.

रशिया घटविणार कच्च्या तेलाच्या निर्यातीवर सध्याची सवलत २५ डाॅलरवरून घटवून २० डाॅलरवर आणण्याची याेजना असल्याचे रशियाचे अर्थमंत्री एंटाेन सिलुआनाेव्ह यांनी सांगितले आहे. त्यामुळे रशियाकडील तेलाची खरेदी महाग हाेणार आहे. अशा स्थितीत इंधनाचे दर वाढण्याची भीती आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल