नवी दिल्ली : चीनकडून अत्यंत स्वस्तात सीमलेस पाईप उपलब्ध केले जात असल्यामुळे देशातील सीमलेस पाईपचा उद्योग संकटात सापडला आहे. यामुळे सीमलेस पाईपचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या नोकऱ्यांत कपात करण्याचा विचार करीत आहेत व त्यासोबत कारखानेही बंद केले जाऊ शकतात, असे या उद्योगांचे म्हणणे आहे.
अमेरिका, कॅनडा, युरोपीय संघ, इंडोनेशिया, ब्राझील आणि मेक्सिेकोमध्ये चीनला डंपिंगरोधी आणि सेफगार्ड शुल्काला तोंड द्यावे लागत आहे. चीनचे सीमलेस पाईपचे उत्पादक भारतात खूपच कमी किमतीत उत्पादन विकत आहेत. देशातील कंपन्या सीमलेस पाईप ४७ हजार ते ५० हजार रुपये टन भावाने विकत असताना चीनचे सीमलेस पाईप २५ ते ३० हजार रुपये टन भावाने उपलब्ध आहेत. असोसिएशन आॅफ सीमलेस पाईप्स अँड ट्यूब्जचे उपाध्यक्ष एस. सरकारने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘अशीच परिस्थिती येत्या दोन ते तीन महिन्यांत कायम राहिली तर प्रत्यक्षात ८ हजार जणांची नोकरी व त्यापेक्षा जास्त अप्रत्यक्षरीत्या रोजगार संधी कमी होईल.
भारतातील सीमलेस पाईप उद्योग संकटात
चीनकडून अत्यंत स्वस्तात सीमलेस पाईप उपलब्ध केले जात असल्यामुळे देशातील सीमलेस पाईपचा उद्योग संकटात सापडला आहे.
By admin | Published: October 4, 2015 10:41 PM2015-10-04T22:41:36+5:302015-10-04T22:41:36+5:30