Join us

Reliance Home Finance, Reliance Infra & Reliance Power : अनिल अंबानींवर सेबीचा वार; ४ तासांत ३ कंपन्यांचे बुडाले २१२६ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 3:21 PM

Reliance Home Finance, Reliance Infra to Reliance Power : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सेबीकडून एक वृत्त आलं आणि त्यानंतर अनिल अंबानींच्या शेअर्समध्ये धडाधड घसरण सुरू झाली.

Reliance Home Finance, Reliance Infra & Reliance Power : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सेबीकडून एक वृत्त आलं आणि त्यानंतर अनिल अंबानींच्या शेअर्समध्ये धडाधड घसरण सुरू झाली. आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरचा दिवस अनिल अंबानींसाठी चांगला दिसत नाहीये. मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांना शुक्रवारी मोठा धक्का बसला आहे. बाजार नियामक सेबीने अनिल अंबानींवर ५ वर्षांची बंदी घातली आहे. अनिल अंबानी यांच्यासह आणखी २४ कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

या वृत्तानंतर अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं आणि घसरण झाली. त्यांच्या रिलायन्स इन्फ्रा (Reliance Infra), रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि रिलायन्स होमबद्दल (Reliance Home Finance) बोलायचं झालं तर यात ४ तासांत १४ टक्क्यांची घसरण झाली. यादरम्यान कंपन्यांचं मार्केट कॅप २१२६ कोटी रुपयांनी कमी झालं.

Reliance Infra- शुक्रवारी कामकाजादरम्यान रिलायन्स इन्फ्रास रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये ९.८५ टक्क्यांची घसण होऊन शेअर २११.९७ रुपयांवर आला.

Reliance Power- रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power Share) शेअरनं आजच ३८.०७ रुपयांवर आपली विक्रमी वाढ नोंदवली होती. परंतु सेबीच्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं आणि शेअर ३४,४८ रुपयांवर आला.

Reliance Home Finance- सकाळच्या सत्रात रिलायन्स होम फायनान्सच्या (Reliance Home Finance Share) शेअरमध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. यानंतर कंपनीचा शेअर ४.९२ रुपयांवर पोहोचलेला. परंतु सेबीच्या वृत्तानंतर यात विक्री दिसून आली आणि कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं आणि तो ४.४५ रुपयांवर आला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविशषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्ससेबी