Join us

संशयास्पद व्यवहार रोखण्यास सेबी सक्रिय

By admin | Published: August 18, 2015 10:04 PM

शेअर बाजारच्या माध्यमातून हवाला व्यवहारातील पैसा वापरण्याच्या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी बाँबे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणखी उपाय योजत आहे

नवी दिल्ली : शेअर बाजारच्या माध्यमातून हवाला व्यवहारातील पैसा वापरण्याच्या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी बाँबे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणखी उपाय योजत आहे. संशयास्पद व्यवहारांबद्दल बीएसईच्या सदस्यांनी सरकारच्या एफआययूला आता दरमहा असा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आपल्या सदस्यांनी लवकरात लवकर याचे पालन करावे, असे बीएसईने म्हटले. बीएसई इलेक्ट्रॉनिक फायलिंग सिस्टीमद्वारे ही माहिती सादर करायची आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत एफआययूकडे आलेल्या एसटीआरची एकूण संख्या कळविण्यासही सांगितले आहे. यानंतर सदस्यांनी हीच माहिती दरमहा पाठवायची आहे.