Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबीने नियम बदलले; म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार

सेबीने नियम बदलले; म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार

हा नियम १५ जून २०२३ पासून लागू होणार असल्याची माहिती सेबीने दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 01:54 PM2023-05-16T13:54:34+5:302023-05-16T13:55:11+5:30

हा नियम १५ जून २०२३ पासून लागू होणार असल्याची माहिती सेबीने दिली आहे.

SEBI changed the rules The mutual fund investment amount will go to the accounts of minors only | सेबीने नियम बदलले; म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार

सेबीने नियम बदलले; म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार

 
मुंबई : बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचे नियम बदलले आहेत. सेबीने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक असेल, तर ती रक्कम काढण्यासाठी अल्पवयीन मुलाचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

सेबी म्हणते... -
-  म्युच्युअल फंडाची पूर्तता केल्यावर, गुंतवणुकीची रक्कम व परतावा केवळ अल्पवयीन मुलाच्या बँक खात्यातच दिला जाईल. 
-  तथापि, अल्पवयीन मुलाच्या पालकांच्या खात्यातून किंवा त्यांच्या संयुक्त खात्यातून गुंतवणूक केली जाऊ शकते. 
-  हा नियम १५ जून २०२३ पासून लागू होणार असल्याची माहिती सेबीने दिली आहे.

...तर तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत
सेबीने सर्व म्युच्युअल फंडांना सांगितले आहे की, नवीन गुंतवणुकीअंतर्गत ही व्यवस्था असेल, हा नियम अल्पवयीन मुलाच्या नावाने आधीच चालू असलेल्या म्युच्युअल फंडांना लागू होईल. सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना यासाठी अल्पवयीन मुलांच्या फोलिओमध्ये नवीन बँक खाते अपडेट करावे लागेल.

कोणते नियम बदलले?
सेबीने २०१९ मध्ये एक नियम आणला होता, यानुसार अल्पवयीन मुलांच्या नावावर कोणतीही गुंतवणूक ही पालकांच्या अंतर्गत असेल, परंतु नाव अल्पवयीन व्यक्तीचे असेल.मात्र, त्यावेळी अल्पवयीन मुलाचे बँक खाते आवश्यक नव्हते. पण नंतर सेबीने सांगितले की, अल्पवयीन मुलाकडे गुंतवणुकीसाठीदेखील बँक खाते असणे आवश्यक आहे. आता गुंतवणुकीची रक्कम काढल्यास ती केवळ अल्पवयीन मुलाच्या बँक खात्यात जाईल.
 

Web Title: SEBI changed the rules The mutual fund investment amount will go to the accounts of minors only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.