Lokmat Money > बिझनेस न्यूज > हिंडनबर्गचे आरोप सेबीच्या प्रमुखांनी नाकारलेही, स्वीकारलेही; म्हणाल्या, सेबीला आधीच दिलेत...

हिंडनबर्गचे आरोप सेबीच्या प्रमुखांनी नाकारलेही, स्वीकारलेही; म्हणाल्या, सेबीला आधीच दिलेत...

Madhabi Puri Buch, Sebi, Hindenburg News: ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने गेल्या वर्षी अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 08:43 AM2024-08-11T08:43:19+5:302024-08-11T08:43:53+5:30

Madhabi Puri Buch, Sebi, Hindenburg News: ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने गेल्या वर्षी अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे.

Sebi chiefs Madhabi Puri Buch neither denied nor accepted Hindenburg's allegations; Said, already given to SEBI... | हिंडनबर्गचे आरोप सेबीच्या प्रमुखांनी नाकारलेही, स्वीकारलेही; म्हणाल्या, सेबीला आधीच दिलेत...

हिंडनबर्गचे आरोप सेबीच्या प्रमुखांनी नाकारलेही, स्वीकारलेही; म्हणाल्या, सेबीला आधीच दिलेत...

‘हिंडनबर्ग रिसर्च’ने ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या वर्षी अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये बुच यांचाही वाटा होता, असे म्हटले आहे. यावर बुच यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी 5 जून 2015 रोजी सिंगापूरमध्ये IPE प्लस फंड 1 मध्ये त्यांचे खाते उघडले होते. यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक 10 दशलक्ष डॉलर्स एवढी होती. हा ऑफशोअर मॉरिशस फंड अदानी ग्रुपच्या संचालकाने इंडिया इन्फोलाईनच्या माध्यमातून स्थापन केला होता. हा फंड टॅक्स हेवन असलेल्या मॉरिशसमध्ये रजिस्टर आहे, असे आपल्याला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दिसत असल्याचा दावा हिंडनबर्गने केला होता. 

याबाबत बुच दाम्पत्याने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आलेले आरोप निराधार आणि तथ्यहिन आहेत. आपले आयुष्य आणि आर्थिक गोष्टी या एखाद्या खुल्या पुस्तकासारख्या आहेत. आम्हाला जे काही खुलासे करायचे होते ते आम्हा गेल्या काही वर्षांत सेबीला दिलेले आहेत, असे माधबी बुच यांनी म्हटले आहे. 

आम्ही तेव्हा सामान्य नागरिक होतो. यामुळे तेव्हाच्या काळातील आर्थिक कागदपत्रांचा खुलासा करण्यास आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही. आम्हाला कोणताही अधिकारी याची विचारणा करू शकतो. हिंडनबर्ग रिसर्चविरोधात सेबीने कारवाई केलेली आहे. यामुळे आमचे चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही योग्यवेळी पारदर्शीपणे तपशीलवार निवेदन जारी करू, असे बुच यांनी म्हटले आहे. 

काय आहे दावा?

सिंगापूर येथील तेथील अगाेरा पार्टनर्स नावाने एका कन्सल्टिंग फर्ममध्ये माधवी यांचा १०० टक्के वाटा हाेता. या फंडातील ८,७२,७६२ डाॅलर एवढी रक्कम विनाेद अदानी यांनी वापरल्याचा दावा आहे.
सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरित केले. 

Web Title: Sebi chiefs Madhabi Puri Buch neither denied nor accepted Hindenburg's allegations; Said, already given to SEBI...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.