Join us  

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; SEBI ने आणला नवीन नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 5:02 PM

Mutual Fund UPDATE : गुंतवलेल्या रकमेची पूर्तता (Redemption) करण्याच्या बाबतीत पडताळणीबाबत नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्त्वाची आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) म्युच्युअल फंड युनिट्सच्या व्यवहारांबाबत एक नवीन अपडेट दिली आहे. यानंतर, आता तुमचे पैसे म्युच्युअल फंडात पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असतील. गुंतवलेल्या रकमेची पूर्तता (Redemption) करण्याच्या बाबतीत पडताळणीबाबत नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

म्युच्युअल फंड युनिट्सच्या व्यवहाराशी संबंधित 'नियम'हे अपडेशन शेअर मार्केट प्लॅटफॉर्मवर म्युच्युअल फंड युनिट्सच्या व्यवहारांशी संबंधित आहे. SEBI ने ऑक्टोबर 2021 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले होते की, 'म्युच्युअल फंड व्यवहारांच्या संदर्भात शेअर ब्रोकर आणि क्लिअरिंग सदस्य म्युच्युअल फंड व्यवहारांसाठी आपल्या नावाने जारी केलेली देयके स्वीकारणार नाहीत.' मात्र, SEBI कडून मान्यताप्राप्त क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या सदस्यांना देयके स्वीकारण्यापासून सूट दिली जाईल.

फसवणूक होण्याची शक्यता कमी राहीलशेअर मार्केट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्यावतीने पैसे स्वीकारणाऱ्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची खात्री केली जाईल. गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवण्यासाठीही त्यांना काम करावे लागणार आहे. म्युच्युअल फंड युनिट्सच्या व्यवहारांबाबत SEBI ने असाच आदेश जारी केला आहे. शेअर मार्केट व्यतिरिक्त, हे ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह इतर घटकांसाठी देखील आहे.

1 मे पासून स्विंग प्राइसिंग यंत्रणा लागू होईलSEBI द्वारे येणारी 1 मे पासून स्विंग प्राइसिंग यंत्रणा लागू केली जाईल. म्युच्युअल फंड योजनांसाठी तयार करण्यात आलेली ही यंत्रणा मोठ्या गुंतवणूकदारांनी अचानक अस्थिर बाजारातून संपूर्ण पैसे काढू नयेत म्हणून कार्यान्वित केली जात आहे. स्विंग प्राइसिंग लागू केल्यावर, गुंतवणूकदारांना फंडातील गुंतवणूक आणि पैसे काढण्याच्या वेळी NAV मिळेल, जी स्विंग फॅक्टर अंतर्गत समायोजित केली जाते.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायपैसा