Join us

वसुलीमध्ये सेबी अपयशी, ७६ हजार कोटी रुपये बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 8:07 AM

अहवालानुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत वसुलीच्या बाबतीत कठीण असलेल्या ८०७ प्रकरणांची ओळख पटविण्यात आली.

नवी दिल्ली : बाजार नियामक सेबीला ७६.२९३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात अपयश आले आहे. ही रक्कम मागच्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे. सेबीने २०२३-२४ च्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. 

अहवालानुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत वसुलीच्या बाबतीत कठीण असलेल्या ८०७ प्रकरणांची ओळख पटविण्यात आली. यातील थकबाकीची रक्कम ७६,२९३ कोटी आहे. २०२३ मध्ये ६९२ प्रकरणांत ७३,२८७ कोटी रुपये बुडाले होते. सेबीने आपल्या अहवालात म्हटले की, ही थकबाकी वसूल करणे कठीण आहे. अनेक उपाय करूनही थकबाकी वसूल होऊ शकलेली नाही. 

कोर्टात प्रकरणांमुळे रक्कम वाढली यात कोर्टात प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे, तसेच एनसीएलटी व एनसीएलएटीमध्ये प्रलंबित प्रकारेही त्यात आहेत. प्रलंबित प्रकरणांत १२,१९९ कोटी अडकले आहेत. ६० प्रकरणे न्यायालयांकडून गठित करण्यात आलेल्या समित्यांच्या समोर आहेत. त्यात ५९,९७० कोटी रुपये अडकलेले आहेत.

टॅग्स :सेबी