Lokmat Money > बिझनेस न्यूज > SEBI Fine on RIL : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

SEBI Fine on RIL : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

SEBI Fine on RIL : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एका आदेशात म्हटले आहे की, जिओ-फेसबुक डीलबद्दल शेअर बाजारांना थेट माहिती न देता वर्तमानपत्रात दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:55 AM2022-06-21T08:55:29+5:302022-06-21T08:59:02+5:30

SEBI Fine on RIL : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एका आदेशात म्हटले आहे की, जिओ-फेसबुक डीलबद्दल शेअर बाजारांना थेट माहिती न देता वर्तमानपत्रात दिली होती.

sebi imposes 30 lakh rupees fine on ril and 2 of its compliance officers | SEBI Fine on RIL : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

SEBI Fine on RIL : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd.) आणि दोन व्यक्तींना जिओ-फेसबुक (Jio-Facebook) डीलबद्दल शेअर बाजारांना थेट माहिती न दिल्याबद्दल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एका आदेशात म्हटले आहे की, जिओ-फेसबुक डीलबद्दल शेअर बाजारांना थेट माहिती न देता वर्तमानपत्रात दिली होती. हे सेबीच्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे सांगत, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सावित्री पारेख आणि के सेथुरामन यांना संयुक्तपणे 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दंडाची रक्कम 45 दिवसांच्या आत जमा करावी 
सेबीच्या आदेशानुसार, दंडाची रक्कम 45 दिवसांच्या आत जमा करावी लागेल. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 9.99 टक्के स्टेक घेण्यासाठी फेसबुकने 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची बातमी 24-25 मार्च 2020 रोजी आली होती, असे सेबीचे न्यायनिवासी अधिकारी बर्नाली मुखर्जी यांनी आदेशात म्हटले आहे. पण 22 एप्रिल 2020 रोजी शेअर बाजाराला याबाबत माहिती देण्यात आली.

Web Title: sebi imposes 30 lakh rupees fine on ril and 2 of its compliance officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.