Join us

सेबीनं PAN कार्डाशी निगडीत नियमांमध्ये केला महत्त्वाचा बदल, गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 1:18 PM

सेबीनं पेपर फॉर्ममध्ये सिक्युरिटीज ठेवणाऱ्यांसाठी नियम सोपे केले आहेत.

बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) पेपर फॉर्ममध्ये सिक्युरिटीज ठेवणाऱ्यांसाठी नियम सोपे केले आहेत. या अंतर्गत पॅन, केवायसी (नो युअर कस्टमर) तपशील आणि 'नॉमिनेशन' नसलेल्या सिक्युरिटीजवर बंदी घालण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. सेबीनं यासंदर्भातील एक परिपत्रक जारी केलं आहे. याचा उद्देश नियम सुलभ करणं हा आहे. हा नियम तात्काळ लागू करण्यात येणार आहे. रजिस्ट्रार असोसिएशन ऑफ इंडिया आणि गुंतवणूकदारांकडून सूचना मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.नियमांनुसार, लिस्टेड कंपन्यांमधील फिजिकल सिक्युरिटीजच्या सर्व धारकांना पॅन, नामांकन, संपर्क तपशील, बँक खात्यांचे तपशील आणि संबंधित 'फोलिओ' क्रमांकासाठी स्वाक्षरी देणं अनिवार्य होतं. SEBI नं यापूर्वी मे महिन्यात सांगितलं होतं की ज्या 'फोलिओ'मझ्ये असे दस्तऐवज १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर उपलब्ध होणार नाहीत, त्यांना इश्यू रजिस्ट्रेशन आणि 'शेअर ट्रान्सफर एजंट' (आरटीए) थांबवणं आवश्यक आहे. मे महिन्यात नियामकानं जारी केलेल्या परिपत्रकात सुधारणा करताना सेबीनं 'फ्रीज' हा शब्द काढून टाकल्याचं सांगितलं आहे.सेबीनं काय म्हटलं?रजिस्ट्रार असोसिएशन ऑफ इंडियाकडून मिळालेला अहवाल आणि गुंतवणूकदारांच्या सूचनांच्या आधारे बेनामी देवाणघेवाण अधिनियम १०९८८ आणि मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत शेअरवर बंदी घालणं आणि त्याच्याशी निगडीत प्रशासनिक आव्हानांना कमी करण्यासाठी वरील तरतूद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सेबीनं म्हटलंय.

टॅग्स :सेबीशेअर बाजारपॅन कार्ड