Lokmat Money > बिझनेस न्यूज > Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?

Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?

SEBI Chairperson Madhabi Puri-Buch : एजन्सी आणि अर्थ मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास केला असून, माधबी पुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:48 PM2024-10-22T14:48:31+5:302024-10-22T14:49:27+5:30

SEBI Chairperson Madhabi Puri-Buch : एजन्सी आणि अर्थ मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास केला असून, माधबी पुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली आहे.

SEBI News : Clean Chit to SEBI Chairperson Madhabi Puri-Buch; Will complete her tenure | Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?

Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?

SEBI News : शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या(SEBI) अध्यक्षा माधबी पुरी-बुच (Madhabi Puri Buch) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना हिंडेनबर्ग रिसर्च आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपांमधून क्लीन चिट मिळाली आहे. आतापर्यंतच्या तपासात निधीचा गैरवापर, पदाचा गैरवापर असे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे माधबी आणि त्यांच्या कुटुंबावर कोणतीही कारवाई होणार नाही.

यावर्षी पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान माधबी पुरी यांचे नाव चर्चेत आले होते. हिंडेनबर्गने त्यांच्यावर अदानी समूहाला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. या नंतर संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरुन माधबी आणि त्यांच्या कुटुंबासह भाजपवर शेअर बाजारातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण, त्यावेळी माधबी आणि त्यांचे पती धवल यांनी आरोपांचे खंडन केले होते.

आता आपला कार्यकाळ पूर्ण करणार
माधबी पुरी बुच यांच्यावर लावलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या चौकशीत कोणताही आक्षेपार्ह पुरावा सापडला नाही, त्यामुळेच आता त्या आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतात. माधबी पुरी फेब्रुवारी 2025 पर्यंत सेबीच्या अध्यक्षपदी राहतील. 

संसदेच्या लोकलेखा समितीने (पीएसी) चौकशी सुरू केली 
अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चसह काँग्रेसने माधबी आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले होते. सेबी प्रमुखांचे अदानी समूहाशी आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा रिपोर्टमधून करण्यात आला होता. याप्रकरणी संसदीय लोकलेखा समितीने (पीएसी) सेबी अध्यक्षांची चौकशी केली. चौकशीत माधबी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात कोणताही पुरावा सापडला नाही, त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. 

Web Title: SEBI News : Clean Chit to SEBI Chairperson Madhabi Puri-Buch; Will complete her tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.