मुंबई : सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) फ्रँकलिन टेम्पलटन इंडियाला त्यांच्या सहा बंद पडलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतलेले गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे आदेश दिले आहेत.
फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना असून, त्यामधील ११६ कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करते. २४ एप्रिल रोजी फ्रँकलिन टेम्पलटनने सहा योजना अचानक बंद केल्या. त्यामध्ये गुंतवणूकदारांचे ३१ हजार कोटी रुपये अडकले आहेत.
विशेष म्हणजे, फ्रँकलिन टेम्पलटनचे जागतिक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिफर जॉन्सन यांनी म्युच्युअल फंडाला असूचीबद्ध सिक्युरिटीजमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त निधी गुंतविण्यास बंदी घातल्याचा आरोप सेबीवर केला आहे. सेबीच्या बंदीमुळे आमच्या फायद्यातील सहा योजना बंद कराव्या लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
असूचीबद्ध सिक्युरिटीजमध्ये झालेल्या प्रचंड गुंतवणुकीमुळे म्युच्युअल फंडाच्या कार्यातील पारदर्शकतेवर परिणाम झाला आणि त्यामुळेच दहा टक्के मर्यादेवर बंदी आणणे आवश्यक झाल्याचे मत सेबीने व्यक्त केले आहे. सेबीने फ्रँकलिन टेम्पलटनला ३ लाख गुंतवणूकदारांना लवकरात लवकर ३१ हजार कोटी रुपयांचा निधी परत करण्यास सांगितले आहे.
फ्रँकलिन टेम्पलटनला सेबीचा आदेश
फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना असून, त्यामधील ११६ कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करते. २४ एप्रिल रोजी फ्रँकलिन टेम्पलटनने सहा योजना अचानक बंद केल्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:21 AM2020-05-11T00:21:14+5:302020-05-11T00:21:46+5:30