Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबीची रिलायन्स इंडस्ट्रीजवर एक वर्षासाठी बंदी, 1000 कोटींचा दंड

सेबीची रिलायन्स इंडस्ट्रीजवर एक वर्षासाठी बंदी, 1000 कोटींचा दंड

भांडवल बाजार नियंत्रक सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका दिला आहे

By admin | Published: March 25, 2017 08:41 AM2017-03-25T08:41:28+5:302017-03-25T08:41:28+5:30

भांडवल बाजार नियंत्रक सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका दिला आहे

Sebi's one-year ban on Reliance Industries, penalty of Rs.1000 crores | सेबीची रिलायन्स इंडस्ट्रीजवर एक वर्षासाठी बंदी, 1000 कोटींचा दंड

सेबीची रिलायन्स इंडस्ट्रीजवर एक वर्षासाठी बंदी, 1000 कोटींचा दंड

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - भांडवल बाजार नियंत्रक सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका दिला आहे. सेबीने रिलायन्सवर शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. रिलायन्ससोबतच अन्य 12 कंपन्यांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या या कंपनीवर फ्यूचर अॅण्ड ऑप्शन्स (F&O) व्यवहारात फसवणूक केल्याच्या दहा वर्ष जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
यासोबतच सेबीने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सुमारे एक हजार कोटींचा दंडही ठोठावला आहे. हे सर्व पैसे व्याजासकट परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु सेबीच्या या निर्णयाविरोधात रिलायन्स इंडस्ट्रीज सिक्युरिटीज ट्रिब्युनलकडे दाद मागणार आहे. हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स पेट्रोलिअमशी संबंधित आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअरमध्ये डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 
 
शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या या कंपनीचं नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीजने अगोदर हे प्रकरण सहमतीने मिटवण्यात यावं यासाठी अर्ज केला होता. मात्र सेबीने हा प्रस्ताव फेटाळला होता. गेल्या काही महिन्यांपासून या दहा वर्ष जुन्या प्रकरणातील कायदेशीर कारवाईला गती मिळाली आहे. याच प्रकरणी सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी महालिंगम यांनी 54 पानांचा आदेश जारी केला होता. आदेशानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि 12 इतर कंपन्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेअर बाजारात एक वर्ष डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यास बंदी घातली आहे.
 
सेबीने या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीजला ठोठावलेला मूळ दंड 447 कोटी रुपये आहे. त्यावर 29 नोव्हेंबर 2007 पासून आतापर्यंत 12 टक्क्यांच्या दराने व्याज देण्यास सांगितलं आहे. या हिशेबाने कंपनीला एकूण सुमारे एक हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहे. 45 दिवसांमध्ये संपुर्ण रक्कम भरावी लागणार आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात बाजारात फसवणूक करण्यात आली आहे, ती पाहता कडक कारवाई करण्यात येत असल्याचं जी महालिंगम यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Sebi's one-year ban on Reliance Industries, penalty of Rs.1000 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.