नवी दिल्ली : सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २,७९0 किलो सोन्याच्या बाँडची नोंदणी नागरिकांनी केली आहे. त्याची किंमत ७२६ कोटी रुपये आहे. या टप्प्यात आधीच्या टप्प्याच्या तुलनेत ही मिळकत जवळपास तिप्पट जास्त आहे.
केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी एक टिष्ट्वट करून यासंबंधीची माहिती जारी केली आहे. त्यांनी म्हटले की, सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३.१६ लाख अर्ज मिळाले. २,७९0 किलो सोन्यासाठी हे अर्ज आले. त्यांची एकूण किंमत ७२६ कोटी रुपये आहे. या योजनेचा पहिला टप्पा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला होता. त्यावेळी ९१५.९५ किलो सोन्याच्या बाँडची मागणी नागरिकांनी नोंदविली होती. त्याची किंमत २४६ कोटी रुपये होती. पहिल्या टप्प्यात ६२,१६९ अर्ज आले होते. पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यातील प्रतिसाद उत्तम असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील बाँड १८ जानेवारी रोजी जारी करण्यात आले होते. २२ जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती. ८ फेब्रुवारी रोजी हे बाँड वितरित केले जातील. या बाँडमध्ये ५ ग्रॅम, १0 ग्रॅम, ५0 ग्रॅम आणि १00 ग्रॅम सोन्याच्या बाँडचा समावेश आहे. त्यांची मुदत ५ ते ७ वर्षे आहे. रोखे जारी करताना वजनानुसार त्याचे व्याज आकारले जाणार आहे. एक व्यक्ती एका वर्षात ५00 ग्रॅम सोन्याचे रोखे खरेदी करू शकतो. पहिल्या टप्प्यात या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकांना रोखे विक्रीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. (वृत्तसंस्था)
दुसऱ्या टप्प्यात २,७९0 किलो सुवर्ण रोख्यांची नोंदणी
सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २,७९0 किलो सोन्याच्या बाँडची नोंदणी नागरिकांनी केली आहे. त्याची किंमत ७२६ कोटी रुपये आहे. या टप्प्यात आधीच्या टप्प्याच्या तुलनेत
By admin | Published: January 29, 2016 03:45 AM2016-01-29T03:45:44+5:302016-01-29T03:45:44+5:30