Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट, जीडीपी वाढीचा वेग 7.1 टक्क्यांवर

दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट, जीडीपी वाढीचा वेग 7.1 टक्क्यांवर

यूपीए सरकारच्या काळातील सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीवरून  वाद उदभवलेला असतानाच चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 07:37 PM2018-11-30T19:37:52+5:302018-11-30T20:24:28+5:30

यूपीए सरकारच्या काळातील सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीवरून  वाद उदभवलेला असतानाच चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी समोर आली आहे.

second-quarter GDP growth at 7.1 percent | दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट, जीडीपी वाढीचा वेग 7.1 टक्क्यांवर

दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घट, जीडीपी वाढीचा वेग 7.1 टक्क्यांवर

Highlightsया आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये जुलै ते सप्टेंबरदरम्यान देशातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग घटून 7.1 टक्क्यांवर आला आहे.आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेने चांगला वेग पकडला होता. त्यामुळे पहिल्या तिमाही जीडीपीमध्ये 8.1 टक्यांनी वाढ झाली होती दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये तब्बल 1.1 टक्यांनी घट झाल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे

नवी दिल्ली - यूपीए सरकारच्या काळातील सकल घरेलू उत्पन्नाच्या (जीडीपी) आकडेवारीवरून  वाद उदभवलेला असतानाच चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारी नुसार या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये जुलै ते सप्टेंबरदरम्यान देशातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग घटून 7.1 टक्क्यांवर आला आहे.  आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेने चांगला वेग पकडला होता. त्यामुळे पहिल्या तिमाही जीडीपीमध्ये 8.1 टक्यांनी वाढ झाली होती. मात्र दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये तब्बल 1.1 टक्यांनी घट झाल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 
दुसऱ्या तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपीमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमागे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन आणि ग्रामीण भागामधून मागणीत झालेली घट ही मुख्य कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. 2018-19 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये घट झाली असली तरी गतवर्षी याच कालावधीत असलेल्या जीडीपीतील वाढीच्या वेगापेक्षा यावर्षीचा वेग जास्त आहे.  दरम्यान, या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 7.5 ते 7.6 एवढा राहण्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेने वर्तवला होता. तर रॉयटर्स पोलमध्येही अर्थतज्ज्ञांनी पहिल्या तिमाहीच्या तुलनेच जीडीपीच्या वाढीचा वेग घटण्याची शक्यता वर्तवली होती.  



 

Web Title: second-quarter GDP growth at 7.1 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.