Join us

दुसऱ्या लाटेमुळे देशाचे झाले दाेन लाख काेटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 9:08 AM

उत्पादनावर माेठा परिणाम; आरबीआयचा आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गतिमान झालेल्या अर्थचक्राला ब्रेक लागला आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या एप्रिल आणि मे महिन्यात देशाच्या उत्पादकतेवर माेठा परिणाम झाला आहे. घटलेल्या उत्पादनाचा तब्बल दाेन लाख काेटी रुपयांचा फटका बसल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट झाले आहे. 

दुसऱ्या लाटेमुळे सर्वच राज्यांमध्ये लाॅकडाऊन किंवा कठाेर निर्बंध लावण्यात आले हाेते. त्यामुळे देशांतर्गत मागणी घटली. त्याचा घरेलू उत्पादनावर माेठा परिणाम झाला. हे नुकसान सुमारे २ लाख काेटी रुपयांपर्यंत असल्याचा आरबीआयचा अंदाज आहे. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ‘स्टेट ऑफ इकाॅनाॅमी’ याबाबत लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेने लहान शहरे आणि ग्रामीण भागालाही विळखा घातला हाेता. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणीवर विपरित परिणाम झाल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.  केवळ लसीकरणाद्वारेच विषाणू नष्ट हाेणार नाही. आपल्याला विषाणूसाेबत जगणे शिकावे लागेल.  याशिवाय संशाेधन आणि लाॅजिस्टीक्स या क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी लागेल, असे या लेखात म्हटले आहे. 

दुसऱ्या लाटेमुळे देशांतर्गत विमान प्रवासी घटलेनवी दिल्ली : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशांतर्गत विमान प्रवासावर माेठा परिणाम झाला आहे. मे महिन्यामध्ये प्रवाशांच्या संख्येत ६३ टक्के घट झाली आहे. एप्रिलमध्ये ५७ लाख प्रवाशांची नाेंद झाली हाेती. मात्र, मे महिन्यात हा आकडा २१ लाखांवर आला. ‘डीजीसीए’ने ही माहिती दिली आहे. मे महिन्यात सर्वाधिक १६ लाख प्रवासी ‘इंडिगाे’ने नाेंदविले आहेत. त्यापाठाेपाठ २ लाख प्रवाशांनी स्पाईसजेटचा वापर केला. असे असले तरीही ‘इंडिगाे’चा अकुपन्सी रेट स्पाईस जेटच्या ६४ टक्क्यांच्या तुलनेत ३९.३ टक्के हाेता.

आशेचा किरणया परिस्थितीतही कृषी क्षेत्र तसेच स्पर्शविरहीत सेवांमध्ये वाढ झाली आहे. औद्याेगिक उत्पादन वाढीस सुरुवात झाली आहे. हे सकारात्मक संकेत असून, व्यापक लसीकरण सुधारणांना चालना देईल, असे लेखकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँककोरोना वायरस बातम्या