Lokmat Money > बिझनेस न्यूज > फसवणूक टाळायची असेल तर 'आधार'ला करा Secure; जाणून घ्या कसं कराल आधार 'मास्क्ड'?

फसवणूक टाळायची असेल तर 'आधार'ला करा Secure; जाणून घ्या कसं कराल आधार 'मास्क्ड'?

आजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारचा वापर वाढल्यानं त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:35 AM2023-12-06T11:35:24+5:302023-12-06T11:35:41+5:30

आजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारचा वापर वाढल्यानं त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत.

Secure Aadhaar to avoid fraud Know how to make Aadhaar masked know step by step procedure | फसवणूक टाळायची असेल तर 'आधार'ला करा Secure; जाणून घ्या कसं कराल आधार 'मास्क्ड'?

फसवणूक टाळायची असेल तर 'आधार'ला करा Secure; जाणून घ्या कसं कराल आधार 'मास्क्ड'?

आजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. बँक खातं उघडण्यासाठी, शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड मिळवण्यासाठी आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधारचा वापर वाढल्यानं त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) मास्क्ड आधारची (Masked Aadhaar) सुरुवात केली आहे. यामुळे तुमचा तपशील चोरला जाण्याचा धोका कमी होतो. तसंच, हा एक सुरक्षित पर्याय म्हणूनही समोर येतोय. मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय ते जाणून घेऊया.

मास्क्ड आधार म्हणजे काय?
मास्क्ड आधार हे युआयडीएआयनं (UIDAI) गोपनीयतेत वाढ करण्यासाठी आणि आधार माहितीचा धोका कमी करण्यासाठी सुरू केलं आहे. मास्क्ड आधारमध्ये आधार क्रमांकाचे पहिले ८ अंक लपलेले असतात, तर फक्त शेवटचे ४ अंक दिसतात. परंतु यात नाव, फोटो आणि क्युआर कोड यासारखे महत्त्वाचे तपशील पाहता येतात.

कुठे वापरू शकता?
UIDAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या संस्थांना परवाना आहे तेच तुमचे आधार कार्ड तपशील आणि कार्ड ठेवू शकतात. म्हणजे परवाना नसलेल्या संस्था तुमचं आधार घेऊ करू शकत नाहीत. त्यामुळे, जेव्हाही तुम्ही परवाना नसलेल्या ठिकाणी जाल तेव्हा तुम्ही मास्क्ड आधार वापरू शकता. तुम्ही ते युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून सहज डाउनलोड करू शकता.

कसं कराल डाऊनलोड?

  • सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in. या वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर आधार एनरॉलमेंट नंबर टाकून कॅप्चा भरा आणि 'Send OTP' वर क्लिक करा. यानंतर Services सेक्शनमध्ये Download Aadhaar पर्याय निवडा.
  • Do you want a masked Aadhaar? चा पर्याय निवडा. हा पर्याय तुम्हाला Review your Demographics Data अंतर्गत सापडेल.
  • यानंतर Download वर क्लिक करा. मास्क्ड आधार पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड होईल.
  • हे आधार कार्ड ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड देखील आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तुमच्या नावाची पहिली चार अक्षरं (आधारमधील) कॅपिटल लेटरमध्ये आणि तुमच्या जन्माचे वर्ष YYYY मध्ये टाकावं लागेल.

Web Title: Secure Aadhaar to avoid fraud Know how to make Aadhaar masked know step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.