Lokmat Money > बिझनेस न्यूज > बनावट नोटा रोखण्यासाठी सुरक्षा उपाय

बनावट नोटा रोखण्यासाठी सुरक्षा उपाय

बनावट नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी नवीन सुरक्षा उपाय योजण्यात येत असून, त्यातहत क्रमांकाची प्रणाली आणि अन्य सात नवे सुरक्षा उपाय योजण्यात येत आहेत

By admin | Published: September 6, 2015 09:46 PM2015-09-06T21:46:18+5:302015-09-06T21:46:18+5:30

बनावट नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी नवीन सुरक्षा उपाय योजण्यात येत असून, त्यातहत क्रमांकाची प्रणाली आणि अन्य सात नवे सुरक्षा उपाय योजण्यात येत आहेत

Security measures to prevent counterfeit currency | बनावट नोटा रोखण्यासाठी सुरक्षा उपाय

बनावट नोटा रोखण्यासाठी सुरक्षा उपाय

नवी दिल्ली : बनावट नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी नवीन सुरक्षा उपाय योजण्यात येत असून, त्यातहत क्रमांकाची प्रणाली आणि अन्य सात नवे सुरक्षा उपाय योजण्यात येत आहेत. प्रारंभी त्यासाठी ५०० रुपये आणि १ हजार रुपयांच्या नोटांवर ध्यान दिले जाणार आहे.
माहीतगार सूत्रांनी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड आणि भारतीय प्रतिभूती मुद्रण आणि निर्माण निगम लि. यांनी सुधारित क्रमांकाचा पॅटर्न सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांमध्ये प्रारंभी बदल केले जातील. त्यानंतर पुढील वर्षी मेपर्यंत अन्य नोटांतही तसे बदल केले जातील.
नवीन सुरक्षा उपायांना सरकारने मंजुरी दिली असली तरीही त्याचा तपशील आम्हाला मिळालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. बनावट नोट आढळल्यास त्यावर ‘बनावट’ असा शिक्का मारून ती तात्काळ जप्त करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला आहे. भारतात खोट्या नोटांची समस्या अलिकडच्या काही वर्षांत वाढली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Security measures to prevent counterfeit currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.