लाभदायक पोर्टफोलिओ बनविण्यासाठी गुंतवणूकदारांची जोखीम पत्करण्याची क्षमता किती, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपला पोर्टफोलिओ सतत फायद्यात कसा ठेवता येईल यासाठी...
रिस्क घ्या, उत्तम रिटर्नही मिळवाशेअर बाजारात अल्प व मध्यमकालीन पातळीवर नुकसान होणे ही सामान्य बाब आहे. कारण चढ-उतार हेच शेअर बाजाराचे वैशिष्ट्य असते. परताव्याची अनिश्चितता ही शेअर बाजारातील गुंतवणुकीत सर्वांत मोठी जोखीम आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जोखिमेसोबत अधिकचा लाभही मिळत असतो.
गेल्या १० वर्षांत निफ्टीने १२ टक्के परतावा दिला आहे. एवढा मोठा परतावा ही दुर्मीळ बाब आहे. मात्र, सर्वांनाच हा परतावा मिळू शकत नाही. जे अधिक जोखीम पत्करण्याची क्षमता बाळगून आहेत, त्यांनाच हा परतावा मिळत असतो. १० वर्षांच्या या कालावधीत अनेकदा गुंतवणूकदारांना मोठे नुकसानही सोसावे लागले, हेसुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे.
तुमच्याकडे ती क्षमता आहे?सर्वोत्कृष्ट गुंतवणूक पोर्टफोलिओसाठी गुंतवणूकदारास जोखीम पत्करण्याची आपली क्षमता माहिती असणे आवश्यक आहे.
नेमके कोण टिकून राहतात? पडझडीच्या काळात जोखीम पत्करण्याची अधिक क्षमता असलेले गुंतवणूकदार बाजारात टिकून राहिले. त्यांना दीर्घकालीन पातळीवर नफा झाला. या पार्श्वभूमीवर जोखीम क्षमतेचे मूल्यांकन गुंतवणूकदाराने करून घ्यायला हवे. मेल्विन जोसेफ, गुंतवणूक तज्ज्ञ
काय कराल? जोखीम मूल्यांकन ही व्यावसायिक पद्धतीने गुंतवणूक पोर्टफोलिओ बनविण्याची युक्ती आहे. जोखीम मूल्यांकन गुंतवणूकदारास जोखीम पत्करण्याची क्षमता सांगते. गुंतवणूक लाभदायक राहील का, हे यातून कळते.
फायदे कोणते?जोखीम क्षमतेमुळे गुंतवणूकदार अल्पकालीन करेक्शनचा यशस्वी सामना करू शकतो. दीर्घकालीन लाभ त्यातून सहजपणे मिळतो.
तीन पायऱ्या कोणत्या?सर्वप्रथम गुंतवणूकदाराच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेची निश्चिती केली जाते. गुंतवणूकदार किती मर्यादेपर्यंत जोखीम पत्करू शकतो, हे यात शोधले जाते.
दुसरी पायरी गुंतवणूकदाराचा गुंतवणूक इतिहास पाहण्याची असते. त्याने पत्करलेल्या जोखिमेचे विश्लेषण केले जाते.
तिसरी पायरी म्हणजे, जोखीम पत्करण्याच्या क्षमतेची तुलना वर्तमानात निश्चित करण्यात आलेल्या जोखीम क्षमतेशी करणे होय. या ३ पायऱ्या पार पाडल्यानंतरच अधिक परतावा देणाऱ्या पोर्टफोलिओंची निवड करण्याची परवानगी गुंतवणूकदारास दिली जाते.