Jio Vs Vi: जुलै महिन्यात जिओ आणि व्हीआय या दोन्ही खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती, त्यानंतर लोकांच्या खिशावरचा भार वाढला होता. आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि व्हीआय ६६६ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. दोन्ही कंपन्या ६६६ रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा देतात.
टॅरिफमध्ये वाढ झाल्यानंतर ६६६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन अनेक युजर्सची पसंती ठरत आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला जिओ आणि व्हीआयच्या ६६६ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनच्या डिटेल्स बद्दल सांगणार आहोत, जेणेकरून कोणता प्लॅन चांगला आहे हे तुम्ही स्वत: ठरवू शकाल.
Jio चा ६६६ रुपयांचा प्लॅन
जिओचा ६६६ रुपयांचा रिचार्ज प्लॅन पूर्वी ८४ दिवसांच्या वैधतेसह येत होता, परंतु आता या प्लॅनची वैधता कमी करून ७० दिवसांची करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला रोज १.५ जीबी डेटा आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लानमध्ये समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा बंद करण्यात आली आहे. या प्लानमध्ये युजर्सला जिओ अॅप्सचा अॅक्सेसही दिला जातो.
Vi चा ६६६ रुपयांचा प्लॅन
व्हीआयचा ६६६ रुपयांचा रिचार्ज प्लान ६४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज १.५ जीबी डेटा आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. व्हीआयच्या या प्लॅनमध्ये युजर्सला वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळते.दोन्ही प्लॅनमध्ये डेली डेटा लिमिट सारखीच आहे, पण व्हीआयच्या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा आहे, जेणेकरून तुम्ही अधिक डेटाचा लाभ घेऊ शकाल.