रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उत्कृष्ट प्रीपेड प्लॅन्सची एक मोठी यादी आहे. या प्लॅन्समध्ये, दैनंदिन डेटासह कंपनी विनामूल्य कॉलिंग आणि बरेच अतिरिक्त फायदे प्रदान ग्राहकांना देते. बर्याच प्लॅन्सपैकी काही वेळा युझर्सना स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट प्लॅन निवडणं कठीण होतं. म्हणूनच आम्ही येथे तुम्हाला जिओच्या काही सुपर व्हॅल्यू आणि ट्रेंडिंग प्लॅनबद्दल सांगत आहोत. या प्लॅन्समध्ये दररोज ३ जीबी डेटासह मोफत कॉलिंग आणि डिस्ने + हॉटस्टारसह विनामूल्य कॉलिंगचीही सुविधा देण्यात येत आहे.
२,५९९ रूपयांचा प्लॅनरिलायन्स जिओचा २,५९९ रुपयांचा प्लॅन सुपर व्हॅल्यू टॅगसह लिस्ट आहे. यामध्ये ३६५ दिवसांची वैधता देण्यात येत असून दररोज २ जीबी डेटासह संपूर्ण वैधतेच्या काळात १० जीबी अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. यानुसार या प्लॅनसोबत एकूण ७४० जीबी डेटा देण्यात येतो. तरंसच दररोज १०० मोफत एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा मिळते. याशिवाय यामध्ये मिळतंय डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.
२४९ रूपयांचा प्लॅनरिलायन्स जिओचा दुसरा सुपर व्हॅल्यू प्लॅन हा २४९ रूपयांचा येतो. याची वैधता २८ दिवसांची असून ग्राहकांना यात ५६ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनसोबत दररोज १०० एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. तसंच या प्लॅनसोबत कंपनी मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देते.
३४९ रूपयांचा प्लॅनरिलायन्स जिओच्या ग्राहकांचा हा सर्वाधिक पसंतीस पडणारा प्लॅन आहे. त्यामुळे ट्रेंडिंग टॅगसह हा प्लॅन कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. या प्लॅनसोबत दररोज ३ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनसोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस, तसंच मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं.