Join us

सोयाबीनला पर्याय एरंडी, उत्पादनात वाढ; गुजरातचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:58 AM

कच्च्या तेलापासून तयार होणारे ‘ल्युब्रिकन्ट’ हे उपउत्पादन एरंडीपासून तयार होऊ शकतात.

मुंबई : भारतातून एरंडी तेलाच्या निर्यातीत तिप्पट वाढ होऊन ती ६ ते ६.५० लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. जगभरात एरंडीच्या तेलाची मागणी सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक कायम मिळकत देणारे आहे. भविष्यात सोयाबीन उत्पादकांनीही पर्याय म्हणून हे पीक घेण्यात अडचण नाही, असे मत सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्शन्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.गुजरातमध्ये असोसिएशनने राबविलेल्या प्रयोगातून तेथील शेतकºयांच्या एरंडी उत्पादनात तिपट वाढ झाली. महाराष्टÑात मोठ्या प्रमाणात घेतले जाणाºया सोयाबीनच्या पिकाची पद्धत एरंडीनुसारच असते. यामुळे राज्यात हा प्रयोग राबवता येईल का?, असे विचारता ते म्हणाले की, एरंडी कुठल्याही जमिनीवर व कमी पाण्यात पिकते. सोयाबीन पट्ट्यात हे पीक घेणे अशक्य नाही. एरंडीचे तेल हे नैसर्गिक असल्याने त्याची मागणी न संपणारी आहे. एरंडीच्या पानांचा औषधी वनस्पती म्हणूनही उपयोग होतो.ल्युब्रिकन्टही शक्यकच्च्या तेलापासून तयार होणारे ‘ल्युब्रिकन्ट’ हे उपउत्पादन एरंडीपासून तयार होऊ शकतात. एरंडीचे तेल काढल्यानंतर उरलेल्या पेंढीपासून (आॅइल केक) ते तयार करता येते.

टॅग्स :व्यवसाय