Join us  

सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 5:32 PM

Selena Gomez Net Worth : अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेज बिलिनेअर बनली आहे. तिने स्वःकर्तृत्वावर ही मजल मारली असून, तरुण अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. 

Selena Gomez in youngest billionaires list : अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि उद्योजक सेलेना गोमेज अवघ्या ३२व्या वर्षी मोठे यश मिळवले आहे. जगभरात लाखो चाहते असलेल्या सेलेना गोमेजने ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिलवळे आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार सेलेनाची नेटवर्थ १.३ अरब डॉलरवर पोहोचली आहे. अमेरिकेत इतके मोठे यश मिळवणारी सर्वात कमी वयातील बिलिनेअर्संपैकी सेलेना एक ठरली आहे. (Selena Gomez is now a youngest billionaire)

32 वर्षीय सेलिब्रेटी उद्योजक असलेल्या सेलेना गोमेज गाणी, ब्रॅण्ड पार्टनशिप आणि अभिनयातूनही भरपूर पैसे कमावते. पण, तिच्या बिलिनेअर बनण्याच्या यशात सर्वात मोठा वाटा मेक-अप कंपनीचा आहे. सेलेना गोमेजची रेअर ब्युटी (Rare Beauty) कंपनी आहे. 

सेलेना गोमेजला 'रेअर ब्युटी'ने बनवले अब्जाधीश

पाच वर्षांपूर्वी सेलेना गोमेजने रेअर ब्युटी कंपनी सुरू केली होती. या कंपनीने तिला टेलर स्विफ्ट आणि रिहाना यांच्यासारख्या श्रीमंत महिलांच्या क्लबमध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे. 

सेलेना गोमेजच्या संपत्तीत रेअर ब्युटीबरोबरच मेंटल हेल्थ प्लॅटफॉर्म Wonderminde चाही मोठा हिस्सा आहे. म्युझिक, अभिनय, प्रॉपर्टीज आणि सोशल मिडिया पार्टनरशिपच्या माध्यमातूनही सेलेनाला भरपूर पैसे मिळतात.

रोनाल्डो, मेस्सीनंतर सेलेना गोमेज सर्वाधिक लोकप्रिय 

सेलेना गोमेजचे इन्स्टाग्रामवर ४२.४ कोटी फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ख्रिस्तियानो रोनाल्डो (६३.८ कोटी) आणि लियोनेल मेस्सी (५०.४ कोटी) यांच्यानंतर सेलेना सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहे. सेलेनाचा प्युमासोबत   $30 मिलियन आणि कोच सोबत $ १० मिलियनचा करार झालेला आहे. इन्स्टाग्रामवरील तिच्या लोकप्रियतेमुळे रेअर ब्युटी या कंपनीला भरपूर फायदा झाला आहे. 

२०२० मध्ये सेलेना गोमेजने असे जाहीर केले होते की, ती बायपोलर डिसऑर्डर आजाराने त्रस्त आहे. Entrepreneur ला दिलेल्या एका मुलाखतीत सेलेना गोमेज म्हणाली होती की, "ती असेच करार करेल, ज्यामध्ये समाजसेवा वा मानसिक आरोग्याचा समावेश असेल." मानसिक आरोग्याच्या त्रासातून जात असलेल्या लोकांच्या मदतीसाठी तिने १० कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. यासाठी तिने रेअर इम्पॅक्ट फंड सुरू केला आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीव्यवसायअमेरिकापैसा