चेतन ननावरे, मुंबई
चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी बंद केल्याची घोषणा केल्यानंतर, राज्यात एका रात्रीत सुमारे २५० किलो सोनेविक्री झाल्याचा अंदाज झवेरी बाजार मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने व्यक्त केला आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे सराफांनी बुधवारी दुकाने सुरू ठेवत व्यवहार मात्र बंद ठेवले.
हा परिणाम काही काळापुरता असून, सोने प्रति तोळा ३१ हजार रुपयांखाली येईल, थोडी वाट पाहावी. विवाहासाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी चढ्या भावाची चिंता करू नये. जुन्या नोटा देण्यासाठी मंगळवारी रात्री सराफांच्या दुकानांत गर्दी होती. त्याचा फायदा घेत, काही सराफांनी प्रति तोळा ३४ हजार रुपयांपासून ४२ हजार रुपये आकारले, असे झवेरी बाजार मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले.
२५० किलो सोने विक्री
चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मंगळवारी बंद केल्याची घोषणा केल्यानंतर, राज्यात एका रात्रीत सुमारे २५० किलो सोनेविक्री झाल्याचा अंदाज झवेरी बाजार मुंबई
By admin | Published: November 10, 2016 04:54 AM2016-11-10T04:54:10+5:302016-11-10T04:54:10+5:30